Ticker

6/Breaking/ticker-posts

iPhone 12, सॅमसंग, वनप्लस ९ प्रो आणि ओप्पोचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, सेल २० मे पर्यंत!

  

*अ‍ॅमेझॉनवर Mobile Savings Day Sale ला सुरुवात.

*२० मे पर्यंत चालणार सेल.

*सॅमसंग गॅलेक्सी एस२१ ५जी वर 24 हजार रुपयांपर्यंत सूट.

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

नवी दिल्ली : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्याकडे उत्तम संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर Mobile Savings Day Sale ची सुरुवात झाली आहे. १६ मे पासून सुरू झालेला हा सेल २० मे पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये अ‍ॅपल, वनपल्स, सॅमसंगसह अनेक कंपन्यांच्या फोनवर बंपर ऑफर आणि सूट मिळत आहे. काही फोनवर तब्बल २४ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

सेलमध्ये एसबीआयच्या क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआय आणि आकर्षक एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेता येईल. या सेलदरम्यानच्या सर्वोत्तम ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

आयफोन १२

सेलमध्ये आयफोन १२ च्या ६४ जीबी व्हेरिएंटला ९ हजार रुपये सूटसह खरेदी करता येईल. ऑफरसह फोनला ७९,९०० रुपयांच्या ऐवजी ७०,९०० रुपयात खरेदी करता येईल. ए१४ बायॉनिक चिपसेटसह येणाऱ्या या फोनमध्ये ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी यात १२ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. तर सेल्फीसाठी यात १२ मेगापिक्सलचाच फ्रंट कॅमेरा मिळेल.


सॅमसंग गॅलेक्सी एस२१ ५जी

अ‍ॅमेझॉनवरील सेलमध्ये या फोनच्या ८जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटवर २४ हजार रुपये सूट मिळत आहे. फोनमध्ये ६.७ इंच फूल एचडी+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Exynos 2100 प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये रियरला एलईडी फ्लॅशसोबत तीन कॅमेरे देण्यात आले आहे. यातील ६४ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेंसरसोबत दोन १२ मेगापिक्सलचे कॅमेरे मिळतील. फोनमध्ये ४०००एमएएच बॅटरी मिळेल.

वनप्लस ९ प्रो ५जी

या फोनच्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरिएंटला ६४,९९९ रुपयात खरेदी करता येईल. फोनचा स्टँडर्ड ईएमआय ३,०६० रुपये आहे. फोनमध्ये Hassleblad चा रियर क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल, ज्याचा ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे. फोनमध्ये ६.७ इंच डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १२०Hz आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४५००mAh बॅटरी देण्यात आली आहे, जो ६५ वॉट वायर्ड आणि ५० वॉटची वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.


ओप्पो एफ१९ प्रो+ ५जी

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येणाऱ्या या फोनवर ४ हजार रुपये सूट मिळत आहे. ऑफरसह या फोनला २५,९९० रुपयात खरेदी करता येईल. फोनमध्ये १०८०x२४०० पिक्सल रिझॉल्यूशनसोबत ६.४३ फूल एचडी+ सुपर एमोलेड पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मीडियाटेक डाइमेंसिटी 800U चिपसेट मिळेल. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ४३१० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या