Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावमध्ये गर्दीचा नवा उच्चांक..! जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला हरताळ ; तहसीलदारांची मूकसंमती ?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव :-  उद्या मंगळवार दिं. ११ मे पासून शेवगाव शहर व तालुक्यात सात दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू होणार असल्याने आज (सोमवारी) शेवगावच्या बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी, या गर्दीमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाटल्यास नवल वाटू नये.

       कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे कडक निर्बंधाचे आदेश आहेत. मात्र, शेवगावमध्ये हे आदेश सर्रास पायदळी तुडविले गेले. येथे सकाळी सर्व दुकाने सर्रास उघडी होती. कुठेही सोशल डिस्टंसिंगचे पालन झाले नाही. बाजारपेठ नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली होती. नगरपालिका प्रशासनानेही या गर्दी कडे पाठ फिरवली.

तहसीलदारांची सावध भूमिका ?

     जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्बंधाचे आदेश असतानाही तहसीलदार अर्चना पागिरे एकदाही रस्त्यावर उतरल्या नाही. याउलट, पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर थांबून व जनतेचा रोष पत्करून दंडात्मक कारवाई करत आहेत. सध्या शेवगाव शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे. तुलनात्मकदृष्ट्या मृत्यूदरही मोठा आहे. मात्र, तहसीलदार सावध भूमिका घेताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या