Ticker

6/Breaking/ticker-posts

' त्या ' लाचखोरीचा मास्टर माईंड कोण ? * त्रिमूर्ती ' अंमलदार फरारी ; एसीबीचा तपास थंडावला..!

पोलीस महासंचालकांच्या हस्तक्षेपाची मागणी

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव (जगन्नाथ गोसावी) :- एसीबीने  पोलिसात लाचखोरीचा गुन्हा दाखल केलेले शेवगाव डिवायएसपी कार्यालयातील ते तिन्ही पोलीस अंमलदार अद्यापही फरारी आहेत. त्यामुळे एसीबीचा तपास मंदावला आहे. ' त्रिमूर्ती 'ची लाचखोरी उघड झाल्याने नगर जिल्ह्याची खाकी डागाळली आहे. त्यामुळे या प्रकरणातील मास्टर माईंड शोधण्यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी आहे.

         डिवायएसपी कार्यालयातील वसंत फुलमाळी, कैलास पवार व संदीप चव्हाण या तीन पोलिस अमंलदारांवर शेवगाव पोलीस स्टेशनला लाचखोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ते तिघे फरारी आहेत. एसीबीच्या गळाला हे तीन मासे लागले असले तरी, अजूनही या कार्यालयात सेवेत असणारे अन्य पोलीस कर्मचारी मोकाट असून त्यांची हप्तेखोरी सुरूच आहे. ते नेमके हप्ते वसुली कोणासाठी करतात ? हे जनतेला पडलेले मोठे कोडे आहे. पोलीस खात्यात जेमतेम दहा वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांकडे महागडी चारचाकी वाहने, बंगला, फ्लॅट, शेतजमिनी या प्रॉपर्टीज कुठून आल्या तसेच त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय ? हा जनसामान्यांचा सवाल आहे.

      डीवायएसपी कार्यालयातील निवडक अधिकारी-कर्मचाऱ्यांची ' ' लॉबिंग ' पाहता त्या सर्वांचीच खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आहे. दस्तुरखुद्द डीवायएसपी यांची नगर जिल्ह्यातील कारकीर्द 

 वादग्रस्त व संशयास्पद ? असल्याने याप्रकरणी पोलीस महासंचालकांनी लक्ष घालावे, अशी मागणी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांचेकडे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या