Ticker

6/Breaking/ticker-posts

रमजान ईदचे नमाज पठण घरातच करावे - सपोनि राजेंद्र सानप

 चिचोंडी पाटील येथे शांतता बैठकीत ईद निमित्त आवाहन







मजान ईद व कोरोनाच्या अनुषंगाने शांतता बैठकीत मार्गदर्शन करताना स.पो.नि. राजेंद्र सानप,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुस्तफा मनियार, जब्बार खान,महेमूद शेख,आदी...( छाया: सोहेल मनियार )

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर :- तालुक्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चिचोंडी पाटील गावामध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने, शासकीय नियमांचे पालन करून, प्रत्येकाने सॅनिटायझर व मास्कचा वापर करून,मोजक्या प्रमुख लोकांच्या उपस्थितीत,जामा मशीद येथे शांतता बैठक घेण्यात आली. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मशिदीमध्ये नमाज पठण न करता घरातच नमाज अदा करावी,असे आवाहन नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले 

ते या वेळी म्हणाले की, योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडू नका,शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे,प्रत्येकाने मास्क चा वापर करावा,  सोशल डिस्टन्स ठेवावा,आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.त्वरित आपल्या गावातील रुग्णालयांमध्ये दाखल व्हा. तेथे चांगले उपचार केले जातील.कोणीही कोरोणा पॉझिटिव्ह होऊ नये यासाठी प्रयत्न करा.रमजान ईद साठी जे साहित्य लागते त्यासाठी पाच जणांची कमिटी स्थापन करून त्यांची कोरोणा चाचणीकरून त्यांच्यामार्फत साहित्य उपलब्ध करून घ्यावे. सदर कमिटी साहित्यासाठी मदत करतील. लोकांच्या अडीअडचणी सोडवतील.नगर तालुका पोलीस स्टेशन च्या वतीने ईद निमित्त गरजूंना मदत करण्यात येईल असे सपोनी सानप म्हणाले. होम कॉरंनटाईन कुणी राहू नये. कोरोनाचे लक्षण आढळताच त्वरित कोवीड सेंटरमध्ये दाखल व्हावे. येणाऱ्या रमजान सणानिमित्त मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा सपोनि राजेंद्र सानप यांनी दिल्या.

    महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मनियार यांनी प्रास्ताविकात सामाजिक, जातीय सलोखा,एकात्मता, भाईचारा,शांतता ही इस्लामची तत्वे आहेत त्यानुसार प्रत्येकाने आचरण करावे. इस्लामच्या आदर्श विचारांचे सर्वांनी पालन करावे, त्याचप्रमाणे पोलीस दल, आरोग्य कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून कोरोना योद्धे बनून लढा देत आहेत.लोकांच्या सुरक्षितेसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्या अनुषंगाने सर्वांनी  प्रशासनास सहकार्य करावे असे सांगितले. याप्रसंगी पोलिस दलातील सपोनी राजेंद्र सानप, फौजदार घोरपडे, गुप्तवार्ता विभागाचे रावसाहेब खेडकर,पो.ना. धर्मनाथ पालवे, पोलीस हवालदार अमिना शेख, पोलीस पाटील निळकंठ खराडे, सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे आभार मानून,पोलिस प्रशासनास सहकार्य म्हणून प्रत्येकाने ईद साधेपणाने व नमाज घरातच अदा करावी.याबद्दल सविस्तर माहिती दिली. मुस्लिम समाजाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते जब्बार खान यांनी उपस्थितांचे आभार मानले.

   या शांतता बैठकीसाठी मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते अमीरसहाब सय्यद,मौलाना मोहम्मद सईद,मुसाभाई मनियार,महेमूद शेख,पत्रकार सोहेल मनियार, मुजाहिद मनियार,रफिक मनियार,हारून मनियार,जहांगीर मनियार, इमरान मनियार,फारुख मनियार,कादर शेख,अन्सार सय्यद,सय्यद वसीम,जिशान सय्यद, सलमान सय्यद,अजहर सय्यद,साजिद सय्यद,आरिफ शेख, आदी या प्रसंगी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या