Ticker

6/Breaking/ticker-posts

ऊस तोडणी कामगारांच्या कोरोना तपासणीसाठी किट उपलब्ध कराव्यात- अ‍ॅड. ढाकणेलोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

टाकळी मानुर: राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम संपत आल्याने शेवगाव व पाथर्डीतील हजारो ऊस तोडणी मजूर पुन्हा गावाकडे परतत आहेत मात्र संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असल्याने या दोन्ही तालुक्यात परतणार्या मजूरांच्या आरोग्याच्या दृष्टीने या तोडणी कामगारांची कोरोना तपासणीसाठी सर्व सरकारी दवाखान्यांत अँटीजेन कीट मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

अ‍ॅड. ढाकणे म्हणाले,राज्यातील यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम जवळपास संपत आला आहे बहुतांशी कारखाने बंद झाले असल्याने आता या महिन्याभरात हजारो ऊस तोडणी कामगार पुन्हा त्यांच्या गावाकडे परतत आहेत. शेवगाव पाथर्डीतील सुमारे ६० हजार मजूर त्यांच्या विविध गावी येणार असून कोरोनाची परिस्थिती पाहता  कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व मजूरांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे.ज्यामुळे संभाव्य संसर्ग वेळीच थोपविण्यास मदत होईल.

 तसेच  कोणी कोरोना बाधित आढळल्यास त्यांच्यावर उपचार तातडीने सुरू होऊ शकतील.सध्या या दोन्ही तालुक्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याचा स्थानिक आरोग्य  यंत्रणांवर मोठा ताण पडत असून राज्य व राज्याबाहेरून तोडणी कामगार येणार असल्याने या दोन्ही तालुक्यातील यंत्रणांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.त्यासाठी गावपातळीवरील तलाठी,ग्रामसेवकांकडून साखर हंगामासाठी गेलेल्या मजूरांची यादी बनवून संभावित संख्येनुसार त्या-त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच शेवगाव व पाथर्डीतील शासकीय व उपजिल्हा रूग्णालयात कोरोना चाचणीसाठी लागणारी अँटिजेन किट,औषधांचा साठा व जास्तीच्या खाटांची व्यवस्था करणेकामी उपाययोजना करणे अतिशय आवश्यक आहे.त्या

चप्रमाणे कुणात सौम्य लक्षणे आढळल्यास त्यांच्या विलगीकरणासाठी त्या गावातील जिल्हा परिषद शाळा,बंदीस्त समाजमंदीरे किंवा सामाजिक सभागृहांमध्ये शासनाकडून व्यवस्था करण्यासाठी प्रशासकीय तयारी करण्यात यावी यातून या दोन्ही तालुक्यातील संभावित संसर्ग वेळीच थोपविण्यास मदत होऊन ऊस तोडणी कामगगारांच्या आरोग्याचीही काळजी घेताली जाऊ शकणार आहे.त्यासाठी विशेष बाब म्हणून नगर जिल्हाधिकारी यांना तातडीने सूचना करून शेवगाव पाथर्डीत अशा व्यवस्थांची उभारणी करण्याचे कळविण्यात यावे.दोन्ही तालुक्यातील स्थानिक यंत्रणांना याकामी सहकार्य करण्यासाठी आपण सामाजिक संघटनांच्या वतीनेही मदत करू असे प्रातापराव ढाकणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या