Ticker

6/Breaking/ticker-posts

मातृ पितृ छत्र हरपलेल्या लेकींच्या विवाहासाठी 'जागर ग्रुप 'चा पुढाकार

 लोकनेता न्यूज

                                (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

शेवगाव :- कोरोना विषाणूचा महामारीत कमावते आई किंवा वडील गमावलेल्या आणि लग्न जुळलेल्या सर्व जाती धर्मातील निराश्रीत लेकींसाठी शेवगावच्या' जागर ग्रुप 'ने मदतीचा हात पुढे केला आहे. हा ग्रुप नजीकच्या काळात साथरोग नियंत्रण कायदा नियमांचे तंतोतंत पालन करून जुळलेले लग्न लावून देणार आहे.

        कोरोना महामारीने कित्येक कुटुंबात होत्याचे नव्हते झाले. कर्ती माणसे डोळ्यादेखत गेली. अनेक गरीब कुटुंबात मुलींची लग्न जुळली होती. काहींच्या तारखा निश्चित झाल्याने घरात लगीनघाई सुरू होती. मात्र, कोरोनाने कोणाची आई तर, कोणाचे वडील हिरावून नेले. कुटुंबासमोर काळोख पसरला. परिणामी, गरिबीमुळे जुळलेली लग्न लांबणीवर पडली.

       महामारीमुळे मातृ पितृ छत्र हरपलेल्या शेवगाव तालुक्यातील लेकींसाठी  'जागर ग्रुप 'ने मदतीचा हात पुढे केला आहे. या विवाह सोहळ्यासाठी ग्रुप नवऱ्या मुलीच्या मेकअपसह लॉन, मंडप, डेकोरेशन, फोटोशूट तसेच भोजनाची व्यवस्था मोफत करणार आहे.

       गेल्या तीन वर्षापासून जागर ग्रुप सामाजिक कार्यात, उपक्रमात आघाडीवर आहे. ग्रुपमध्ये १०० जोडपी समाविष्ट आहेत. दिवाळी पहाट, आरोग्य शिबीर तसेच सामाजिक कार्यासाठी या ग्रुपमधील सदस्य कौटुंबिक मेळाव्यातून विचारांची देवाण-घेवाण करतात. ' जागर ग्रुप 'ला कोणीही पदाधिकारी नाही. विचाराने आपापसातील वर्गणीतून ग्रुपचे कामकाज चालते.

      विवाह नोंदणीसाठी संजय फडके, बापूसाहेब गवळी, द्वारकानाथ बिहाणी, जगदीश आरेकर, प्रा.काकासाहेब लांडे, डॉ. दिनेश राठी, टिंकूशेठ बंब, शिवाजी भेळके, राजेंद्र झरेकर, नंदकिशोर खिरोडे, राजीव रसाळ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या