Ticker

6/Breaking/ticker-posts

दिलासादायक :नगरला आज करोना बाधितामध्ये निम्म्याने घट

*आज ३३८८ रूग्णांना डिस्चार्ज 

*नव्या २१२३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.७६ टक्के*


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: : जिल्ह्यात आज  ३३८८ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६० हजार ६८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.७६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ३९० इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८४०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८७५ आणि अँटीजेन चाचणीत ४०८ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४४, अकोले २६२, जामखेड ०७, कर्जत ८५, नगर ग्रामीण ६०, नेवासा २०, पारनेर ५९, पाथर्डी ६९, राहता ०२, राहुरी ०३, संगमनेर ५०, शेवगाव १०६, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ४६, कॅंटोन्मेंट बोर्ड १८, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५२, अकोले ०४, जामखेड ०६, कर्जत १३, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १३२, नेवासा २१,  पारनेर २३, पाथर्डी १०, राहाता ११०,  राहुरी २४, संगमनेर २९, शेवगाव १९, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर ६०, कॅंटोन्मेंट बोर्ड १५ आणि इतर जिल्हा १९ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ४०८ जण बाधित आढळुन आले. मनपा ३०, अकोले ०१,  जामखेड ०२, कर्जत ०३, कोपरगाव ६६, नगर ग्रामीण ०५, नेवासा ३४, पारनेर ५२,  पाथर्डी १७,  राहाता ०९, राहुरी ८६, संगमनेर २५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ५८, श्रीरामपूर १० आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ८९२, अकोले ४१, जामखेड १५३, कर्जत २०४,  कोपरगाव १३१, नगर ग्रामीण ३३७, नेवासा १४०, पारनेर १५७, पाथर्डी ९८, राहाता ३९८, राहुरी १५१, संगमनेर १२१,  शेवगाव २०६,  श्रीगोंदा ११२,  श्रीरामपूर १११, कॅन्टोन्मेंट ९३,  इतर जिल्हा ४२ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या