Ticker

6/Breaking/ticker-posts

रशियाच्या 'स्पुतनिक व्ही' लसीची भारतातील किंमत जाहीर

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

 *'स्पुतनिक व्ही' लशीच्या एका डोसची किंमत ९९५.४० रुपये

*दोन डोससाठी २००० हजार रुपये मोजावे लागणार

*'मेड इन इंडिया' स्पुतनिक व्ही लशीची किंमत कमी असण्याची शक्यता

 नवी दिल्ली : रशिया निर्मित 'स्पुतनिक व्ही' या करोनाविरुद्ध लढणाऱ्या लशीची भारतातील किंमत अखेर जाहीर करण्यात आलीय. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज'नं दिलेल्या माहितीनुसार, आयात करण्यात आलेल्या 'स्पुतनिक व्ही' या लशीची किंमत जवळपास १००० रुपयांच्या घरात असेल. लसीची मूळ किंमत ९४८ रुपये अधिक ५ टक्के जीएसटी (४७.४० रुपये) इतका दर या लसीच्या प्रत्येक डोससाठी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या लशीच्या प्रत्येक डोससाठी लाभार्थींना एकूण ९९५.४० रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु, भारतात निर्माण करण्यात येणाऱ्या 'स्पुतनिक व्ही' या लसीच्या डोसची किंमत मात्र थोडी कमी असू शकते. नागरिकांना 'स्फुतनिक व्ही' लसीचे एकून

 दोन डोस घ्यावे लागतील. त्यामुळे दोन्ही डोससाठी लाभार्थींना २ हजार रुपये मोजावे लागतील.

भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या कस्टम फार्मा सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड 
दीपक सप्रा यांना स्पुतनिक व्ही लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये देण्यात आलाय.

भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसी वापरात आहेत. त्यातच आता 'स्पुतनिक व्ही' या लशीचाही वापर सुरू करण्यात येणार आहे.पुढील आठवड्यापासून लसीच्या थेट विक्रीला सुरुवात करण्यात होण्याची शक्यताही आरोग्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आलीय.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या