Ticker

6/Breaking/ticker-posts

पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर

नगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


पाथर्डी : पाथर्डी तालुक्याचे सुुुपुत्र पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब कैलासराव ढोले यांना नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक  जाहीर झाले आहे. पदक जाहीर होताच त्यांचे राहते गाव दुलेचांदगाव येथे व पाथर्डी, नगर येथे आंनद व्यक्त करण्यात आला.डी.वाय. एस.पी ढोले यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


2016 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलीस उपअधीक्षक पदासाठी निवड झाल्यानंतर 1 वर्ष नाशिक येथील पोलीस अकॅडमी मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी स्वतःच्या पसंतीने गडचिरोली सारख्या नक्षलदृष्ट्या  अतिसंवेदनशील अशा जिल्ह्यामध्ये काम करण्यास सुरुवात केली. 

उत्कृष्ट नियोजन करत त्यांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. पाच महिन्यापूर्वी ढोले यांच्या नेतृत्वाखालील सी-सिक्सटी कमांडो पथकाने पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. गेल्या दोन वर्षांच्या त्यांच्या अल्पशा कारकिर्दीत अनेक नक्षलवादी शरण आले तसेच त्यानी अनेक नक्षलवाद्यांना नेस्तानाबुत करण्यात यश मिळविले. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीची दखल घेउन हे मानाचे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्यामुळे नगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या