Ticker

6/Breaking/ticker-posts

पत्रकार सुनील आढाव यांचा वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात ; किराणा मालाची भेट

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव :-  कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वाचकांनी वृत्तपत्रांकडे पाठ फिरविल्याने सध्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे मोठे हाल सुरू आहेत.शेवगाव शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांची अवस्था बिकट बनल्याने त्यांच्या मदतीसाठी येथील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा शेवगाव तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार सुनिल आढाव यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मदतीचा हात पुढे करत त्यांना एक महिना पुरेल इतका किराणा माल देण्याचे दायित्व पार पाडले आहे. या छोट्याशा पण वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे वृत्तपत्र विक्रेते हरखून गेले आहेत. 

       कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लाँकडाऊन आहे. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. रोजगार बुडाला. परिणामी, खाण्या-पिण्याची आबाळ सुरु झाली. शेवगाव शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांची ही अवस्था पाहून पत्रकार सुनिल आढाव यांचे मन सुन्न झाले. त्यांनी याबाबत स्वतः पुढाकार घेऊन काल मंगळवारी  (दिं.४ रोजी) राजेंद्र देशपांडे, अनिल देऊळगावकर, अनिल खैरे, जीवन अंगरख, ऋषिकेश हुसळे, ईश्वर व्यवहारे, कदीर शेख आदी वृत्तपत्र विक्रेत्यांना दर्जेदार किराणा मालाचे किट सुपूर्द केले.       यावेळी शेवगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास बुधवंत, सचिव सचिन सातपुते, इलेक्ट्रानिक मिडीयाचे अध्यक्ष संदीप देहाडराय, सचिव अलीम शेख, राजू घुगरे, जगन्नाथ गोसावी, सुरेश विधाते आदी उपस्थित होते.

        संकटसमयी किराणा साहीत्याची भेट दिल्याबद्दल वृत्तपत्र विक्रेत्यांनी प्रा.आढाव यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या