Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाच्या सर्व नव्या स्ट्रेनवर 'स्पुतनिक लाइट'चा फक्त एकच डोस पुरेसा..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मॉस्कोः भारतात करोनावरील लसीचा तुटवडा दिसून येत आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पण अनेक राज्यांमध्ये लस उपलब्ध नसल्याने हे लसीकरण खोळंबले आहे. आता अशातच रशियातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाला करोनावरील एका डोसची लस बनवण्यात यश आलं आहे. या लसीचे नाव' स्पुतनिक लाइट' (असे आहे आणि ही लस ७९.४ टक्के इतकी प्रभावी आहे. स्पुतनिक- V लसीच्या पुढची ही स्पुतनिक लाइट लस आहे. युरोप आणि अमेरिका वगळता जगातील ६० देशांनी स्पुतनिक- V लसीच्या वापराला परवानगी दिली आहे आणि ते वापरत आहेत. भारतातही स्पुतनिक व्ही लसीला मंजुरी देण्यात आली आहे. १ मे रोजी या लसीची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. यामुळे नवीन एक डोस असलेल्या लसीलाही भारतात पुढील काळात परवानगी मिळू शकते.

' स्पुतनिक लाइट' ही लस मॉस्कोतील गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. स्पुतनिक- V प्रमाणेच 'स्पुतनिक लाइट' लसीलाही रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDFI) आर्थिक पाठबळ दिले आहे. जगात या 'स्पुतनिक लाइट' लसीची किंमत ही १० डॉलर म्हणजे जवळपास ७३० रुपयांहून कमी असेल, अशी माहिती RDFI चे सीईओ किरिल दिमित्रिएव्ह यांनी गुरुवारी दिली.

' स्पुतनिक लाइट' लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ७ हजार नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. या चाचण्या रशिया यूएई आणि घानामध्ये करण्यात आल्या. २८ दिवसांनी याच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. यातून आलेल्या निष्कर्षात ही लस करोनाच्या सर्व नवीन स्ट्रेनवरही प्रभावी असल्याचं समोर आलं. इतर दोन डोस असलेल्या अनेक लसींच्या तुलनेह ही लस अधिक प्रभावी असल्याचं डेटातून स्पष्ट झालं.

' स्पुतनिक लाइट'चे फायदे

* लसीचा प्रभाव ७९.४ टक्के इतका आहे. लस घेतलेल्या १०० टक्के नागरिकांमध्ये १० दिवसांनी अँटीबॉडीत ४० टक्क्यांनी वाढली.

* लस घेणाऱ्या सर्व नागरिकांमध्ये करोना व्हायरसच्या  S-प्रोटीन विरोधात प्रतिकारशक्ती तयार झाली.

* एकच डोस असल्याने अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये  लसीकरणाचा वेग वाढवता येऊ शकतो.


*  'स्पुतनिक लाइट' २ ते ८ डीग्री तापमानात स्टोअर करता येऊ शकते. यामुळे तिची वाहतूक सहज करता येऊ शकते.

* ज्यांना आधी करोनाचा संसर्ग झाला होता, त्यांच्यावरही ही  लस प्रभावी ठरली आहे.

* लस घेतल्यानंतर करोना संसर्गाचा गंभीर परिणाम कमी  होईल. संसर्ग झाल्यास बहुतेक जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडणार नाही.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या