Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक :उपचारासाठी गेलेल्या महिलेवर मांत्रिकाकडून बलात्कार, पीडित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न ..

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

संगमनेर : उपचार करण्याच्या बहाण्याने एका मांत्रिकाने नात्यातीलच महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील सदस्य आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी धीर दिल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून मांत्रिक सावित्रा बाबुराव गडाख (वय ५५ रा. पारेगाव ता. संगमनेर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांत्रिकाने महिलेला उपचारासाठी आणखी दोनदा येण्यास सांगितले होते. येताना दारूच्या बाटल्या, भेळ, विडीचा बंडल घेऊन येण्यास मांत्रिक सांगत असे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एका ४५ वर्षीय महिलेच्या बाबतीत तिच्या माहेरी संगमनेर तालुक्यात ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भावाच्या ओळखीने नात्यातील मांत्रिक असल्याने महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. उपचारासाठी ती आपले पती आणि मुलासोबत जात असे. २३ एप्रिल रोजी रात्री एकच्या सुमारास मांत्रिकाने पती आणि मुलासमोरच महिलेला दारू पाजली आणि त्यांच्यापासून थोडे अंतर बाजूला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अशक्तपणा आणि अंग थरथर कापणे यावर बरीच वर्षे अन्य उपचार घेतले तरी फरक पडत नसल्याने माहेरच्या मंडळींच्या सांगण्यावरून हे कुटुंब अंधश्रद्धेचं बळी ठरलं आहे.

यासंबंधी महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मला दोन विवाहित मुली आहेत. मुलाचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. लहान मुलगी महाविद्यालयात शिकते. लग्न झाल्यापासून महिलेला अशक्तपणाचा त्रास आहे. त्यावर उपाय केले तरी फरक पडत नव्हता. त्यावर त्यांच्या भावाने नात्यातील एका मांत्रिकाबद्दल माहिती दिली. त्यानुसार पाच वर्षांपासून या मांत्रिकाकडे उपचार सुरू झाले. त्या मांत्रिकांच्या अंगात येत असून तो भूतबाधाही काढत असल्याचे सांगण्यात येत होते.


सुरुवातीला महिला आपल्या भावासोबत जात असे. मांत्रिकाने उदी व अंगारा देऊन पाण्यात टाकून घेण्यास सांगतले. मात्र, त्यानेही फरक पडत नव्हता. त्यामुळे पुन्हा पुन्हा जावे लागत होते. आता महिला पतीसोबत जात असे. मांत्रिक त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या आणण्याची मागणी करीत असे. मात्र, ते दारू नेण्याचे टाळत होते.

पुढील वेळेस येताना भेळीचा पुडा, बिडीचा बंडल, दारूच्या बाटल्या घेऊनच या, असे मांत्रिकाने बजावले होते. २३ एप्रिलला त्रास होऊ लागला. त्यामुळे महिला, त्यांचा पती आणि मुलगा मांत्रिकाकडे गेले. जाताना त्याने मागणी केल्याप्रमाणे साहित्य घेऊन गेले. रात्री आठच्या सुमारास ते मांत्रिकाच्या वस्तीवर पोहोचले. मात्र, त्यावेळी अन्य लोक उपचार घेण्यासाठी आले होते. त्यांचे नंबर होऊपर्यंत यांना प्रतीक्षा करावी लागली. मध्यरात्री एक वाजता त्यांचा नंबर आला.

मांत्रिकाने महिलेच्या हातात तीन लिंबे दिली. पती व मुलाच्या समोरच जबदस्तीने दारू प्यायला लावली. त्यानंतर भूतबाधा काढायची आहे, असे सांगून पती व मुलापासून दूर शेतात नेले. अंधारात तेथे बलात्कार केला. यावेळी महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशक्तपणामुळे काहीही करता आले नाही. आता तू बरी होशील पण असेच आणखी दोनदा यावे, लागले असे मांत्रिकाने बजावले.

पहाटेच्या सुमारास ते सर्वजण घरी आले. मात्र, महिलेला खूप अस्वस्थ वाटत होते. भीतीपोटी त्या दिवशीची कपडेही महिलेने जाळून टाकली. घाबरलेल्या महिलेने दोन दिवसांनी घरात दोरीने फास लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीने पाहिल्याने त्यातून ती बचावली. तेव्हा तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाली.


पतीसह अन्य कुटुंबीयांनी त्यांना धीर दिला. पुन्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या अॅड. रंजना गवांदे यांनीही समुपदेशन केले. त्यानंतर पोलिसांत जाऊन फिर्याद देण्यात आली. संगमनेर तालुका पोलिसांनी मांत्रिकाविरूद्ध अत्याचार आणि जादूटोणा विरोधी काय
द्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसंच आरोपीला अटक केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या