Ticker

6/Breaking/ticker-posts

दिलासादायक ! बीड जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत घट

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

बीड :जिल्ह्यामध्ये रविवारी करोनाच्या ८९७ नव्या रुग्णांची नोंद झाली. अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात एका दिवशी नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येचा आकडा एक हजारांपेक्षा कमी आला आहे. जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्येत होणारी घट यातून स्पष्ट झाली आहे.


जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत, महिनाभरापासून दररोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंदहोत होती. रविवारी जिल्ह्यातील ४०५६ लोकांचे नमुने घेण्यात आले होते यातील ८९७ जणांना कोरोना संसर्ग झाला असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. त्याचबरोबर रविवारी दिवसभरात १०८५ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होत आहे, ही प्रशासनासाठीही दिलासादायक गोष्ट आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या