Ticker

6/Breaking/ticker-posts

निवृत्त भूमी अभिलेख अधिकाऱ्याकडे ८८ लाखांचे घबाड ; ४ जिल्ह्यांत प्रॉपर्टी !

 








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

पुणे: भुमी अभिलेख विभागाचे तत्कालीन उपसंचालक बाळासाहेब वानखेडे (वय ५८) व त्याच्या पत्नीच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून मुंढवा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे याच्याकडे ८८ लाख ८५ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.

वकिलामार्फत एक कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक असताना बाळासाहेब वानखेडे याला अटक केली होती. त्यानंतर वानखेडेच्या मालमत्तेची उघड चौकशी केली जात होती. या चौकशीत १९८९ ते २०१९ या दरम्यान वानखेडेकडे उत्पन्नापेक्षा ८८ लाख ८५ हजार रुपयांची मालमत्ता जास्त असल्याचे आढळून आले. त्यानुसार वानखडे व त्याची पत्नी उषाकिरण  बाळासाहेब वानखेडे (वय ५४) या दोघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब वानखेडे हा सध्या सेवानिवृत्त आहे. त्याच्या व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या पुणे शहर, मुंबई, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील मालमत्ता व घरांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक 
राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विजयमाला पवार या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या