Ticker

6/Breaking/ticker-posts

लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील यांचे जीवन लोकांसाठी समर्पित : महंत भास्करगिरीजी

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

    शेवगाव : लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी तसेच सर्वसामान्यांच्या भल्यासाठी खर्ची घातले.अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी उपेक्षित घटकांसाठी काम केले. त्यांच्या सामाजिक, राजकीय विचारांची वाटचाल पुढे चालू ठेवणे ही त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन दत्तधाम श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य प.पू. भास्करगिरीजी महाराज यांनी केले.


     स्व.मारुतराव घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शेवगाव येथे आयोजित कार्यक्रमात आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, व्यापार, पत्रकारिता, कला, वैद्यकीय क्षेत्रातील महणीय व्यक्तींचा तसेच लष्करातील निवृत्त जवानांचा लोकनेते मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्काराने प.पू. भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. नरेंद्र घुले पाटील हे होते. व्यासपीठावर माजी आमदार पांडुरंग अभंग व चंद्रशेखर घुले पाटील, प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.विजय चोरमले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


   भास्करगिरीजी महाराज पुढे म्हणाले, शेतकरी व जनतेच्या कल्याणासाठी घुले पाटलांनी सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन भेंडे येथे उजाड माळरानावर श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. ते ऋषितुल्य जीवन जगले. त्यांच्या मनाला जातीभेद कधी शिवला नाही.त्यांनी जनतेचा प्रपंच आपला मानला. आजच्या कार्यक्रमातून मला त्यांचे समर्पित जीवन दिसले.त्यांच्याच विचाराची शिदोरी व जनतेचा विश्वास सोबत घेऊन घुले बंधूंची वाटचाल सुरू आहे असे सांगून ते म्हणाले, ' राजकारण '  या शब्दात मोठी ताकद असून देश व जनतेचा विचार करणे हा राजकारणाचा ' पैलू ' आहे. मात्र,  आजचे राजकारण ढगाळ असून, ते कुंठीत असल्याचे ते म्हणाले.


   अध्यक्षपदावरून बोलताना डॉ.नरेंद्र घुले पाटील म्हणाले, स्व. घुले पाटलांनी सर्वसामान्य जनतेला आपले कुटुंब मानले. त्यांच्या भल्यासाठी त्यांनी शेवगावच्या मातीत अखेरचा श्वास घेतला, असे सांगून त्यांनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रशेखर घुले पाटलांना सर्वांनी ताकतीने साथ देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहन केले.


    याप्रसंगी दिनकर महाराज अंचवले, अनिल महाराज वाळके, उद्धव महाराज सबलस, मौलाना हाजी आबेद हाफिज, प्रकाश कातकडे महाराज, कल्याण काळे, हमीद सय्यद, राज योगिनी ब्रह्मकुमारी पुष्पा बहेनजी, सिस्टर ज्युलियाना डिसूजा, संतोष पटवेकर, डॉ. संजय लड्डा, बिजलाल बाहेती, श्रीराम धूत, ताराचंद भंडारी, मयूर वैद्य, उमेश घेवरीकर, सुधीर सबलोक, लेफ्टनंट कमांडर निशांत फलके, जनार्दन लांडे पाटील, मच्छिंद्र जमधडे, अँड.किरण अंधारे, कानिफ म्हस्के, मारुती खांबट, शिवाजी बडे, अविनाश मंत्री, दत्तात्रय कोरडे, काकासाहेब भापकर, मारुती सातपुते, उत्तमराव पाटील, प्रा.डॉ.अशोक ढगे, भास्कर कोलते, मौलाना नासिरभाई, डॉ.भागनाथ काटे, गणपत महाराज आदी मान्यवरांना स्व.घुले पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रारंभी संत ज्ञानेश्वर महाराज व लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या