Ticker

6/Breaking/ticker-posts

LPG गॅस सिलिंडरचा चेहरामोहरा बदलणार; असा दिसणार

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः आपल्या घरी येत असलेले छोटे किंवा मोठे सिलेंडर्स लाल किंवा निळ्या रंगात आपण नेहमीच पाहतो. तसेच हे लोखंडी सिलिंडर्सही खूप जड असतात, ज्यास उचलण्यासही खूप त्रास होतो. परंतु आता सिलिंडरमधील रंगाढंगात बदल होणार आहे. कारण आता  आहे. हेवी सिलिंडरचा चेहरामोहरा बदलणार आहे. एवढेच नव्हे तर हे सिलिंडर्सही पारदर्शक होणार आहेत, जेणेकरून आपणास सिलिंडर संपलाय की नाही तेसुद्धा लगेच समजणार आहे. इंडियन ऑईलने स्वतःच नव्या काळातील सिलिंडरबद्दल माहिती दिलीय आणि हा सिलिंडर कसा असेल हे आपण फोटोमध्ये देखील पाहू शकता. या सिलिंडरमध्ये काय खास असेल आणि हे सिलिंडर इतर सिलिंडर्सपेक्षा कसे वेगळे असणार आहेत, याचीही माहिती घ्या.

 

सिलिंडर सध्या दिल्ली आणि हैदराबादमध्ये उपलब्ध

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आता इंडेनकडून कंपोझिट एलपीजी सिलिंडर देऊ केले आहेत. हे सिलिंडर सध्या दिल्ली आणि हैदराबादमध्ये उपलब्ध आहेत आणि या सिलिंडरसाठी तुम्ही जवळच्या सिलिंडर विक्रेत्याशी संपर्क साधू शकता. हे सिलिंडर लोखंडी सिलिंडरसारखे नाहीत, परंतु ते अतिशय स्टायलिश आहेत आणि दिसण्यातही आकर्षक आहेत. या सिलिंडरमधील ग्रिप हँडलपेक्षा डिझाईन बरेच वेगळे आहे.

या सिलिंडरमध्ये काय विशेष?

या सिलिंडरची खास गोष्ट म्हणजे ते जुन्या सिलिंडरपेक्षा 50 टक्के कमी वजनाचे आहेत. त्याच वेळी लोकांना त्यांच्या देखाव्याची खूप आवड आहे आणि ते कमी वजनाने देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून आपण लहान सिलिंडर देखील खरेदी करू शकता. या सिलिंडरच्या पारदर्शक आकारामुळे आपण बाहेरून सिलिंडर पाहूनच अंदाज लावू शकता, आतमध्ये किती एलपीजी गॅस शिल्लक आहे, यासाठी तुम्हाला सिलिंडर उचलण्याची गरज भासणार नाही. तसेच सिलिंडर खरेदी करताना तुम्हाला सिलिंडरमध्ये किती गॅस आहे हेसुद्धा समजणार आहे.

सिलिंडर गंजण्याची भीती सतावणार नाही

हे सिलिंडर लोखंडी असणार नाहीत, त्यामुळे म्हणून आपणास गंजण्याची भीती सतावणार नाही. हे सिलिंडर्स 5 आणि 10 किलो वजनात उपलब्ध असतील. जर आपल्या घरात सिलिंडरचा जास्त वापर होत नसेल तर आपण 10 किलोचे हे छोटे सिलिंडर खरेदी करू शकता, जे आपल्यासाठी उपयुक्त ठरतील. तसेच स्वयंपाकघरातील सौंदर्य वाढविण्यासाठी देखील उपयुक्त असतील.

सुरक्षेसाठी विशेष काळजी

इंडियन ऑईलने सुरक्षेविषयी सांगितले आहे की, सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे आणि सिलिंडरला स्टायलिश बनवण्याबरोबरच सेफ्टीशी कोणतीही तडजोड केलेली नाही आणि ते वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या