Ticker

6/Breaking/ticker-posts

पोलार्डचा जलवा सुरु, IPL 2021 पोलार्डच्या बॅट्ची ‘जादू’ मोसमातील सगळ्यात लांब षटकार..!

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

चेन्नई :  आयपीएल 2021 च्या 14 व्या पर्वातील 9 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला 13 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने टॉस जिंकून 150 धावा केल्या. हे आव्हान हैदाबादच्या फलंदाजांना पेलवलं नाही. या सामन्यात मुंबईचा वेगवान फलंदाज कायरन पोलार्डने  2021 च्या आयपीएल मोसमातला सर्वांत लांब षटकार ठोकला.

 

मोसमातील सगळ्यात लांब षटकार

मुंबईचा अष्टपैलू खेळाडू  किरण पोलार्ड हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चांगली खेळी केली. त्याने 22 चेंडूत 35 धावा काढल्या. ज्यावेळी मोठे शॉट्स मारणं अवघड जात होतं त्यावेळी त्याने एकेरी दुहेरी धावा घेतल्या. डावाच्या 17 व्या ओव्हरधमध्ये मुजीब रहमानच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्डने सगळ्यात लांब षटकार खेचला. या षटकाराची लांबी 105 मीटर होती. आयपीएल 2021 च्या मोसमातील हा सर्वांत लांब षटकार ठरला.

कायरन पोलार्डच्या 105 मीटर षटकाराअगोदर या मोसमातील लांब षटकार मरण्याचा विक्रम बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता. त्याने मुंबईविरुद्धच 100 मीटरचा षटकार खेचला होता.

पोलार्डच्या फटकेबाजीने मुंबईच्या 150 धावा

मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करायचं ठरवलं. रोहित शर्मा आणि डावखुरा क्विंटन डिकॉकने डावाची सुरुवात अतिशय धडाक्यात केली. पहिल्या बॅटिंग पॉवरप्लेवर मुंबईने राज्य केलं. 36  चेंडूत मुंबईने 53 धावा धावफलकावर लावल्या. मात्र धावगती वाढवण्याच्या नादात रोहित शर्मा आऊट झाला. नंतर हैदराबादचा हुकमी एक्का राशीद खान आणि मुजीब रहमानने मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. इशान, सुर्या आणि हार्दिकला फार चमकदार कामगिरी करता आला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये कायरन पोलार्डने 17 धावा काढल्या. त्यामुळे मुंबईला 150 चा आकडा गाठता आला.

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या