Ticker

6/Breaking/ticker-posts

Exit Poll: बंगालमध्ये पुन्हा तृणमूलचीच सत्ता, जनमत चाचणीचा अंदाज









 लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नवी दिल्ली : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलं. विधानसभा निवडणूक २०२१ चा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी आज मतदानाची वेळ संपताच या निवडणुकीचे विविध एक्झिट पोल अर्थात जनमत चाचणी जाहीर झालेत. पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांत कुणाची सत्ता स्थापन होऊ शकते, याचा अंदाज या एक्झिट पोलमधून लक्षात येऊ शकतो. जनमत चाचणीत पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता स्थापन होऊ शकते, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.

पश्चिम बंगाल २०२१ चा एक्झिट पोल

रिपब्लिक - सीएनएक्स
तृणमूल काँग्रेस : १३३
भाजप : १४३
सीपीएम + : १६
इतर : ०

टाईम्स नाऊ - सी व्होटर
तृणमूल काँग्रेस : १५८
भाजप : ११५


सीपीएम + : १९
इतर : ०

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान पार पडलं. बंगालमध्ये २७ मार्च, , , १०, १७, २२ आणि २६ एप्रिल रोजी नागरिकांनी आपलं मत नोंदवलंय. यानंतर राज्यात पुन्हा एका तृणमूल काँग्रेस सत्ता स्थापन करणार की भाजप पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारणार? हे २ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल.

तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१


- तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात ६ मतदान रोजी मतदान पार पडलं. तामिळनाडूत एकूण ७१.४३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय.

आसाम विधानसभा निवडणूक २०२१

- आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान पार पडलं. २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानात जवळपास ८२.०४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय.

केरळ विधानसभा निवडणूक २०२१


- केरळमध्ये १४० विधानसभा मतदारसंघांत निवडणूक पार पडल्या. राज्यात ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. केरळमध्ये जवळपास ७० टक्के मतदानाची नोंद झाली.

पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक २०२१


- पुदुच्चेरीतही ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात झालेल्या मतदानात ८१.६४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय. काँग्रेस सरकार अल्पमतात आल्यानंतर इथे विधानसभा निवडणूक घेण्यात आल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या