Ticker

6/Breaking/ticker-posts

BSNL च्या २४९ रुपयांच्या प्लानध्ये मिळणार डबल डेटा अन् ६० दिवस कॉलिंग फ्री..!

 






* बीएसएनएलकडून ग्राहकांसाठी नवीन प्लान

* २४९ च्या प्लानमध्ये डबल डेटा, फ्री कॉलिंग

* खासगी कंपन्यांना बीएसएनएलची जोरदार टक्कर


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत  संचार निगम लि.  (BSNL) ने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. मोबाइल रिचार्ज प्लान्स आणि इंटरनेट डेटाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीने एक जबरदस्त रिचार्ज प्लान आणला आहे. BSN  ने एक २४९ रुपयांचा प्लान लाँच केला आहे. या प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्स मध्ये Airtel, Jio आणि Vi सारख्या टेलिकॉम कंपन्यांना जबरदस्त टक्कर मिळत आहे.

२४९ रुपयांच्या प्लानमध्ये काय आहे खास
बीएसएनएलने नुकतेच २४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानला लाँच केले आहे. या प्लानध्ये प्रीपेड ग्राहकांना रोज 2GB Data दिला जात आहे. याशिवाय, युजर्संना कोणत्याही नेटवर्कमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना रोज १०० SMS फ्री दिले जात आहे. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. एक प्रीपेड रिचार्ज प्लान आहे. या First Recharge Coupon (FRC) ला गेल्या महिन्यात प्रमोशनल ऑफर अंतर्गत बाजारात उतरवले गेले आहे. हा प्लान अशा ग्राहकांसाठी आहे जो पहिल्यांदा रिचार्ज करणार आहेत.

दोन महिन्यापर्यंत रिचार्जपासून मुक्ती
बीएसएनएलच्या या २४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता ६० दिवसांपर्यंत आहे. म्हणजेच ग्राहकांना एकदा रिचार्ज केल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत रिचार्ज करण्याची गरज राहणार नाही.

लवकरच देशात सुरू होणार 4G सेवा
केंद्र सरकारने संपूर्ण देशात ४ जी सेवा सुरू करण्यासाठी BSNL ला परवानगी दिली आहे. आता BSNL पूर्ण देसात ४ जी सेवा उपलब्ध करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनीने तयारी सुरू केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या