Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल












लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:-सध्या देशात विशेष करून राज्यामध्ये कोविड १९  ची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली आली आहे. शासनानेही कडक स्वरूपात लॉक डाऊन जाहीर केले असून या पार्श्वभूमीवर  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकेच्या कामकाज वेळेत बदल केला असून दिनांक २३एप्रिल ते दिनांक ३० एप्रिल पर्यंत बँकेचे शाखांचे कामकाज ग्राहकांसाठी कॅश व्यवहार करण्यासाठी सकाळी  १०.३० वा. ते दुपारी २.०० वाजेपर्यंत  चालणार असल्याचे माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके ,व्हॉ.चेअरमन माधवराव कानवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माध्यमातून जिल्ह्यातील ८५० ते ९०० विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पात्र कर्जदार शेतकरी सभासदांना चालू वर्षाचे जनरल कम मंजूर करण्यात आले असून जिल्ह्यातील विविध शाखा द्वारे खरिपाचे पिकांसाठीचे कर्ज वितरण मोठ्या प्रमाणावर चालू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेला दिलेल्या पीक कर्जाची उद्दिष्ट प्रमाणे बँक कर्ज वाटप करणारच असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना व भगिनींना तसेच बँकेच्या इतर सर्व ग्राहकांना कोविड १९ पासूनचे स्वतःचे संरक्षण करून शाखांमध्ये गर्दी न करता सर्वांनी एकमेकाच्या सहकार्याने बँकिंग कामकाज चालवण्याची विनंती बँकेचे चेअरमन उदयराव शेळके यांनी केली. 

बँकेचे कर्मचारी व सोसायटीचे सचिव हे या परिस्थितीतही चांगले काम करत असून त्यांना आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून सध्या बँकेचे जवळपास १६० कर्मचारी हे कोविड १९ पॉझिटिव्ह निघाला आहे व ८ कर्मचारी निधन पावले  आहेत त्याच प्रमाणे ३० कंत्राटी कर्मचारी ही पॉझिटिव्ह असल्याची माहितीही श्री शेळके यांनी दिली




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या