Ticker

6/Breaking/ticker-posts

अँड.द्वारकानाथ बटुळे यांच्या पुढाकाराने कोविड रुग्णांसाठी मोफत अन्नाची पाकिटे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे शेवगाव शहरात ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये, यासाठी येथील नामवंत अँड. द्वारकानाथ बटुळे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अन्नछत्र सुरू केले आहे. या अन्नछत्राचे उद्घाटन काल शुक्रवारी (दिं.२३ रोजी) कामदा एकादशीच्या शुभ पर्वणीला शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या हस्ते झाले.




      दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत गरीब,गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून शेवगाव येथील डॉ. आंबेडकर चौकातील श्री कॉम्प्लेक्समध्ये अन्नाची पाकिटे मोफत पुरविली जाणार आहेत. शुभारंभ प्रसंगी १५० गरजूंना शाबुदाणा खिचडी पाकिटाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पाथर्डीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, नायब तहसीलदार मयुर बेरड व रमेश काथवटे, ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ कराड, सभापती डॉ. क्षितिज घुले, डॉ.सौ. सरोज बटुळे, कारकून नवनाथ केकाण आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक औरंगाबाद हायकोर्ट अँड.निळकंठ बटुळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या