Ticker

6/Breaking/ticker-posts

परमवीर सिंग यांच्या अंडरवर्ल्ड संबंधाची राज्य सरकारने चौकशी करावी ; 'या' मंत्र्याची मागणी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते, ही पुढे आलेली बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

 नगरमध्ये आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले, शंभर कोटी रुपयांच्या संबधी आरोप झाले म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी होते. मात्र, ज्या परमविर सिंह यांच्या संदर्भामध्ये एक हजार कोटी रुपयांचा आरोप होतो, अकोला येथे गुन्हा दाखल होतो, त्यांची मात्र चौकशी होत नाही. एका पोलीस अधिकाऱ्यांने दोन दिवसापूर्वी तक्रार केली त्यामध्ये त्यांनी परमवीर सिंग यांचे अंडरवर्ल्ड गुन्हेगारीशी संबंध होते, असे म्हटले आहे म्हणून आता या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी तात्काळ केली पाहिजे, असे मुश्रीफ म्हणाले.

ग्रामविकासमंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगरमध्ये आज आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी करोनावर देखील भाष्य केले. करोनाच्या दुसऱ्य लाटेत परिस्थिती गंभीर होण्यास आपल्या सर्वांचा गाफीलपणा जबाबदार आहे असे ते म्हणाले. पहिल्या लाटेनंतर आपण आवश्यक ती काळजी घेतली नाही आणि उपाययोजनाही केल्या नाहीत. आता तर तिसरी लाट येणार आहे म्हणतात. त्यावेळीही आपण या उपाययोजना करू शकलो नाही, तर राज्य चालविण्यास अपयशी ठरलो, असेच म्हणावे लागले, असेही ते म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या