Ticker

6/Breaking/ticker-posts

मा.उपसरपंच शरद पवार यांच्या मागणीला यश ; चिचोंडी पाटीलला बंधाऱ्याचे काम सुरु ..

  नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील मेहेकरी नदीवर पवार पट्टा शिवारात होणार आधुनिक बंधाराचिचोडी पाटील येथील मेहेकरी नदीवरील पवारपट्टा शिवारातील बंधाऱ्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे या प्रसंगी मा.उपसरपंच शरद पवार, इंजिनीयर,कॉन्ट्रॅक्टर,शेतकरी आदी (छाया : सोहेल मनियार)

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील मेहेकरी नदीवरील पवार पट्टा शिवारातील बंधाऱ्याचे काम मागील दोन दिवसापूर्वी स्थानिक शेतकरी व शरदभाऊ पवार यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्यामुळे काम पूर्णपणे बंद केले होते,

त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे  इंजिनियर उदमले  व कॉन्ट्रॅक्टर विलास शेडाळे यांनी मशीनद्वारे लगत शेतकऱ्यांना शेतात येणाऱ्या पाण्याची लेवल दाखवण्यात आली, बंधाऱ्याच्या भिंतीची लांबी वाढवण्यात आली व नदीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांना भराव टाकून शिवारातील पुढील शेतकऱ्यांसाठी त्यावरून रोड करून देण्याचे कबूल केले व यापुढे सर्व शेतकऱ्यांना विचारात घेऊन ३४ लक्ष रु बंधाऱ्याच्या इस्टिमेट प्रमाणे काम करून दिले जाईल, 

कामाविषयीचा बोर्ड लावला जाईल.सर्व शेतकऱ्यांना व ग्रामपंचायतला या कामाचे इस्टीमेंट दिले आहे.यापुढे काम चालू असताना जिल्हा परिषदचे इंजिनियर किंवा अधिकृत व्यक्ती कामावर असेल अशी सर्वांसमोर ग्वाही दिली. 

यावेळी युवानेते शरदभाऊ पवार, दिलीप कांकरिया ,ग्रामपंचायत सदस्य माऊली ठोंबरे,संतोष कोकाटे,परशुराम विधाते,महेश पडोळे,स्थानिक शेतकरी चंद्रकांत पवार ,मच्छिंद्र पवार, सुरेश पवार ,अभिषेक पवार, साहेबराव ससे,आदित्य गोरे,गोरख पवार, योगेश पवार ,शरद कांबळे ,सुभाष गवळी व शिवारातील शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या