लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
वाशिम: जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या येवती गावात जुन्या वादावरून एका
गटाने मेडिकलवर
हल्ला चढवला. काही जणांनी मेडिकल दुकानदारावर
लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. तर काहींनी दगडफेक केली. यात दुकानदार जखमी झाला. ही
सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
येवती गावात २० एप्रिल रोजी सकाळी ही धक्कादायक घटना
घडली. गावातील दोन गटांत जुना वाद होता. तो उफाळून आला. तक्रार का केली म्हणून एका
गटाने मेडिकलवर हल्ला केला. दुकानदाराला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न
केला. तर त्या गटातील एकाने दगड फेकल्याने दुकानदार सुधीर शिंदे यांना दुखापत झाली
आहे.
ही सर्व घटना मेडिकल दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही
कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन गटांत जुना वाद असल्याचे सांगण्यात आले. त्यात एका
प्रकरणात तक्रार केली म्हणून ही मारहाण केल्याचे बोलले जाते.
ही सर्व घटना मेडिकलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
होत असल्याचे हल्लेखोरांना समजले. त्यातील एकाने या कॅमेऱ्यावर काठी मारून तो
फोडला. सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर वस्तूंची तोडफोड करून २० हजार रुपयांचे नुकसान
झाले आहे. तशी तक्रार पोलिसांत दिली असून, या प्रकरणी १४ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. या घटनेचा तपास वाशिम ग्रामीण
पोलीस करत आहेत.
0 टिप्पण्या