Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दस्त नोंदणी सोईसाठी ऑनलाईन सेवा

  लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:- सद्यस्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढलेला आहे. यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. सदर सेवांचा नागरिकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी या विभागच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता पीडीई व्दारे डाटा एन्ट्री करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डाटा एन्ट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहे.

नागरिकांनी सदर पीडीई डेटा एन्ट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईटवर  eStep-Inया प्रणालीव्दारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेल्या सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर, समक्ष संपर्क साधून  वेळ आरक्षित केली नसल्यास (Walking) दस्त नोंदणी होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वत:पेन आणणे, एकच पेन एकमेकांत सह्यांसाठी वापरु नये, आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी.

 विभागाच्या वेबसाईटवर लिव्ह ॲण्ड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह ॲण्ड लाइसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी ( फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात येत आहे. सेवा सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य केले असून त्याचा वापर करुन दस्त नोंदणीबाबत शासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या