Ticker

6/Breaking/ticker-posts

मनसेचा पाठपुरावा :खरवंडी येथे होणार शासकिय कोव्हीड सेटरं , अधिकाऱ्यांनी केली आज जागेची पाहणी

 मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी ना . बाळासाहेब थोरातांकडे केली होती मागणी




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खरवंडी कासार : - खरवंडी कासार व परिसरात कोरोना रूग्णाची सख्यां जास्त आहे गेल्या काही दिवसात १० ते १२ व्यक्तीचे कोरोना मुळे मुत्यु झाला आहे पाथर्डी खरवंडी हे अतंर जास्त आहे त्यामुळे खरवंडी येथे शासकिय कोव्हीड सेटरं होणे गरजेचे असल्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे केली  होती त्यामुळे आज प्रातांधीकारी देवदत्त केकान तहसीलदार श्याम वाडकर यांनी  खरवंडी येथे कोव्हीड सेटंर साठी जागाची पहाणी केली 



 पाथर्डी येथे महसूल मंत्री बाळासाहेब  थोरात साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत देवीदास खेडकर यांनी  पूर्व भागातील खरवंडी कासार याठिकाणी शासकीय कोव्हिड सेंटर सुरू करण्याची मागणी केली महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी  व तहसीलदार  तातडीने खरवंडी कासार येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खरवंडी कासार याठिकाणी लसीकरणाची व्हॅक्सिन व करोना टेस्टिंग किट ची उपलब्धता तातडीने करण्याचे निर्देश दिले होते 

 त्याप्रमाणे आज तहसिलदार यांनी रवरवंडी येथे भेट दिली खरवंडी कासार बाजारपेठेत होणारी गर्दी बँकेत होणारी गर्दी याबदल खेद व्यक्त केला जो शासकीय नियमाचे उलघंन करेल त्याच्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले गटविकास अधीकारी शितल खिडे पशुधन विकास अधीकारी जगदिश पालवे विस्तार अधीकारी प्रशांत तोरवणे 

 सरपंच  प्रदीप पाटील ग्रामसेवक अगंणवाडी सेवीका आशा स्वयंसेवीका यांची बैठक घेत कोराना साथ अटोक्यात येण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सदंर्मात मार्गदर्शन केले जो कायदयाचे उलघंन करेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या