Ticker

6/Breaking/ticker-posts

दोन आठवड्यात करोना थैमान घालणार; अमेरिकन तज्ज्ञानी वर्तवला अंदाज

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

वॉशिंग्टन: जगभरात करोनाचा कहर पुन्हा जोर पकडत असताना दुसरीकडे चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आगामी दोन आठवड्यांमध्ये करोनाचा संसर्ग जगभरात थैमान घालणार असून बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज अमेरिकन साथीचा रोग विशेषज्ञ मायकल ओस्टरहोम यांनी वर्तवला आहे.

मायकल ओस्टरहोम हे मिनेसोटा विद्यापीठातील सेंटर फॉर इंफेक्शियस डिजीज रिसर्च अॅण्ड पॉलिसी विभागाचे संचालक आहे. अमेरिकन वाहिनी एनबीसीसोबत बोलताना त्यांनी हा अंदाज वर्तवला. ओस्टरहोम यांनी सांगितले की, करोना महासाथीचा आजार पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारखा आहे. येत्या काही दिवसात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ही संख्या आतापर्यंतच्या बाधितांपेक्षा अधिक असणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.


ओस्टरहोम यांनी पुढे म्हटले की, पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारख्या परिस्थितीचा सामना संपूर्ण जग करत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेत बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली असून ही संख्या आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फॉसी यांनी शनिवारी इशारा देताना सांगितले की, अमेरिकन नागरिकांनी काळजी न घेतल्यास अमेरिकेत पु्न्हा एकदा करोनाची लाट येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक आरोग्याचे उपाय वेगाने वाढवण्याची आवश्यकता आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणावर केल्यास बाधितांच्या वाढत्या संख्येला अटकाव करता येऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या