Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रतापराव हेच खरे जनतेचे प्रतिनिधी; खासदार सुप्रिया सुळै यांचे गौरवोग्दार

 पाथडीॕ येथील कोविड केअर सेंटरचे खा . सुळे यांच्या हस्ते  व्हिडीओ काँन्फरसिंगव्दारे लोकार्पण

*स्वतः कोरोनाशी लढत असतानाही लोकांची चिंता करणारे अॅड ढाकणे खरे लोकसेवक


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथडीॕ- स्वतः कोविडने बाधित असूनही समाजाची या महामारीत चाललेली परवड पाहवत नसल्याने लोकांच्या भाल्यासाठी,त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची ढाकणे यांची तळमळ ही खर्या लोकसेवकाची ओळख ठरते.माजी मंत्री बबनराव ढाकणे व परिवार नेहमीच मतदारसंघाच्या कामासाठी अग्रेसर राहतआले असून कोरोना काळातही त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून प्रतापराव ढाकणे हेच खरे जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत असे गौरवोग्दार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.

   केदारेश्वर साखर कारखाना व कै.सुमनताई ढाकणे प्रतिष्ठानच्यावतीने पाथडीॕ येथील कोविड केअर सेंटरच्या लोकापॕण प्रसंगी त्या व्हिडीओ काँन्फरसिंगव्दारे बोलत होत्या.नायब तहसिलदार पंकज नेवसे,शिवशंकर राजळे,सभापती बंन्सी आठरे,संचालक वैभव दहिफळे,विष्णू सातपुते,राजेंद्र गर्जे,सिताराम बोरूडे,रामराव चव्हाण,अमोल गर्जे,मुकूंद गर्जे,योगेश रासने,फारूखख शेख,देवा पवार,हूमायून आतार,किरण खेडकर,डाॕ.राजेंद्र खेडकर,संपत गायकवाड,अभय गांधी,दिगंबर गाडे,डाॕ.दीपक देशमुख,चांद मणियार,सःंतोष जिरेसाळ,अविनाश पालवे उपस्थित होते.

   .सुळे म्हणाल्या,कोरोनाचे संकट राज्यात वाढले असून सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यंत्री अजित पवार कोरोना रोखाण्यासाठी सर्वतोपरी काम करत आहेत.शेवगाव व पाथडीॕही कोविड रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने इथल्या रूग्णांना तालुक्यातच आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी ढाकणे परिवाराच्या पुढाकारातून पाथडीॕ व कारखान्यावर कोविड सेंटर उभारले आहे.ढाकणेंनी नेहमीच स्वतःचे दुःख बाजूला सारत लोकांची मदत केल्याची  अनेक उदाहरणे आहेत.आजही प्रतापराव प्रभावतीताई कोरोनाचे उपचार घेत असतानाही त्यांनी मतदारसंघातील लोकांसाठी सामाजिक कतॕव्य निभावले.अशा परिस्थितीत ढाकणेंकडून प्रेरणा घेण्यासारखी ही घटना असून आपण शरद पवार यांनाही ही गोष्ट सांगितल्यावर त्यांनीही मोठे कौतुक केले.  शिवशंकर राजळे म्हणाले,खरे तर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जे करायला हवे ते काम ढाकणे कुटूंबिय करत आहेत.तालुक्याचे आमदार केवळ बैठकांचा फासॕ करत आहेत.सरकारी रूग्णायलयात मनृसेने आंदोलन केल्यानंतर आमदार बैठक घेतात.महसूलमंत्र्यांचा दौरा आल्यानंतर आमदार तहसिलदारसोबत आढावा घेतात तर ढाकणेंनी कोविड सेंटरची घोषणा केल्यानंतर आमदारांना ऊशिराचे शहाणपण सूचते.खरे हे काम आमदारांनी मागच्या महिन्यातच करायला हवे होते.

  प्रास्तविकात रूषिकेश ढाकणे म्हणाले,आई-वडील दोघेही उपचार घेत आहेत.मात्र अशाही स्थितीत त्यांना जनतेचीचिंता सतावते आहे.आमदार तथाकथित अकराशे कोटींच्या निधीचा दावा करतात त्यातील थोडी रक्कम जरी आरोग्य यंत्रणेसाठी मिळाली असती तरी आज एवढी हेळसांड रूग्णांची झाली नसती.फक्त खोटे आकडे लोकांवर थोपवले जातात.दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना कल्पना दिल्यावर त्यांनी तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही प्रतापकाकांना फोन करत आरोग्य सुविधा पुरविण्याचे कळवले.याला म्हणतात संवेदशिलता.सूत्रसंचालन बाळासाहेब घुले यांनी केले तर आभार डाॕ.राजेंद्र खेडकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या