Ticker

6/Breaking/ticker-posts

’चला हवा येउ दया’ ‘अन् पाठांतर करताना झोपले भाऊ कदम’

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई- झी मराठीवरील अत्यंत गाजलेला शो चला हवा येउ दयामधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या अत्यंत जवळचा आहे. प्रत्येकजण प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतो. त्यातही मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलेला विनोदवीर म्हणजे भाउ कदम त्यांचा विनोदाचं टायमिंग आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून प्रेक्षक आपसूकच त्यांच्या प्रेमात पडतात. याच विनोदवीराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो प्रेक्षकांना हसायला भाग पाडतोय.

भाऊ कदम रिहर्सल करताना झोपतात किंवा त्यांचे संवाद कधीही पूर्ण पाठांतर होत नाहीत, असं आपण कार्यक्रमाच्या स्किटमधील विनोदांमध्ये ऐकतो. परंतु, ते प्रत्यक्ष अनुभवायची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. भाऊ यांच्यासोबत काम करणारा अभिनेता कुशल बद्रिके याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात भाऊ पाठांतर करताना चक्क झोपी गेलेत आणि ते झोपेत डुलक्या देत आहेत. या व्हिडिओत कुशल आधी भाऊंना हाक मारत त्याला नीट झोपायला सांगतो. त्यावर उत्तर देताना भाऊ म्हणतात की, 'नाही, पाठांतर करायचंय.' भाऊंचा हा पवित्रा पाहून व्हिडीओ पाहणाऱ्याला हसू आवरणार नाही हे मात्र नक्की.


भाऊंच्या या व्हिडिओवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी त्यांना तुम्ही किती चांगलं काम करता, म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे. तर काहींनी आतापर्यंत फक्त विनोदांमध्ये ऐकलं होतं आणि आता खरचं पाहतोय, असं म्हटलंय. काही युझर्सनी त्यांना तुम्ही नाटक तर करत नाही ना असा प्रश्न विचारलाय. परंतु, भाऊंच्या या व्हिडीओने चाहत्यांना पुन्हा एकदा पोट धरून हसायला भाग पाडलं आहे हे नक्की.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या