Ticker

6/Breaking/ticker-posts

खरवंडी कासार येथे कोरोणा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर ग्रामपंचायत कडुन कारवाई मात्र पोलीस प्रशासनाचे असहकार्य

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 खरवंडी कासार . पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खरवंडी कासार येथे पाच व्यक्ती  मयत झाल्यानतंर  खरवंडी कासार व परिसरात कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने खरवंडी कासार चा  कँटोन्मेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला .  

       सदर वृत्त असे की खरवंडी कासार येथे कोरोणा मुळे  पाच व्यक्ती   मृत्यूमुखी पडल्याने व कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने पाथर्डी तहसीलदार यांनी खरवंडी कासार कँटोन्मेंट झोन जाहीर केले आहे त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले गावात विना मास्क फिरणारे कोरोणाचे नियम उल्लंघन करणारे व्यापारी यांचे विरुद्ध ग्रामपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली मात्र या कारवाई दरम्यान  नागरिक व बाजार पेठे मध्ये येणार ग्राहक हे नियम न पाळता कारवाई करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याबरोबर   वाद घालत  आहेत मात्र पोलीस बंदोवस्त बरोबर नसल्याने कर्मचारी हतबल होत आहे 

  दोन दिवसापुर्वी ही  पाथर्डी चे  पोलीस निरीक्षक  यांना कल्पना दिल्यानंतर बिट  हवालदार सुरेश बाबर खरवंडी कासार येथील आल्यानंतर त्यांनी नागरिक व व्यापाऱ्यास समज दिली तसेच  ग्रामपंचायत प्रशासनाने  ही दंडात्मक कारवाई केली खरवंडी कासार येथे रोज सकाळी सात ते अकरा अत्यावश्यक सेवा चालू राहील मात्र दवाखाने औषधालय 24 तास सुरू राहतील विना मास्क येणाऱ्या व कोरोना  नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे ग्रामपंचायतच्या वतीने  जाहीर केले  ग्राम विकास अधिकारी अशोक दहिफळे खरवंडी कासार चे सरपंच प्रदीप पाटील  अमोल  जायभाये, महादेव जगताप ,कोतवाल रामदास गायकवाड ,भगवान जगताप, अंबीर तांबोळी यांनी विना परवाना दुकाण उघडणाऱ्या व्यापारी वर्ग  वीणा मास्क फिरणाऱ्या ग्रामस्थ व प्रवाशाना समज देत दडांत्मक कारवाई केली 

चौकट- पोलीस प्रशासनाची दिरंगाई ग्रामपंचायत प्रशासन दंडात्मक कारवाई केल्यानंतर कोरोणा नियम उल्लंघन करणारे नागरिक, व्यापारी ,ग्रामविकास अधिकारी ,ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याशी वाद निर्माण होतात  सरंपच  प्रदीप पाटील यांनी पोलीस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे व पोलीस निरीक्षक यांना दुरध्वणी द्वारे कल्पना दिली   खरवंडी कासार कँटोन्मेंट झोन मध्ये आहे ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी  यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली मात्र कल्पना देऊन ही पोलीस प्रशासन  वेळेवर येत नाही 

वराती मागुण घोडे प्रमाने पोलीस येतात गावात गर्दी होते तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनास पोलीसानी मदत करणे गरजेचे आहे मात्र वाद विवाद झाल्यानतंर व गर्दी ओसरल्या नतंर पोलीस दाखल होतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या