Ticker

6/Breaking/ticker-posts

पारनेर महाविद्यालयास व्यसनमुक्ती अभियाना अंतर्गत प्लॅटीनअम पदक

 

पारनेर महाविद्यालयास व्यसनमुक्ती अभियाना अंतर्गत सर्वाधीक जागृती केल्याबद्दल प्लॅटीनअम पदक समवेत प्राचार्य  डॉ.रंगनाथ आहेर,उपप्राचार्य डॉ.दिलीप ठुबे,  प्रा.संजय आहेर,प्रा.स्नेहल आहेर,डॉ.अशोक घोरपडे,डॉ़ हरेष शेळके,सुनिल चव्हाण,डॉ.सुधीर वाघ,प्रतिक्षा तनपुरे आदी(छाया -दादा भालेकर)

लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पारनेर: पारनेर महाविदयालय उपक्रमशील  सृजनशिल महाविदयालय म्हणून सावित्रीबाई फुले विदयापीठामध्ये  ओळखले जाते कारण शैक्षणिक गुणवत्ते बरोबर महाविदयालय समाजातील वाईट बाबींवर प्रखरपणे आवाज उठविण्याचे काम करत आहे  महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने व्यसनमुक्ती अभियान हाती घेतले या अभियाना अंतर्गत गावो गावी जाऊन व्यसनमुक्ती जनजागृती घडवुन आणली त्यामध्ये प्रामुख्याने अनेक छोट्या मोठया तालुक्यातील अनेक गावांमध्ये जावुन शाळा महाविद्यालयातील मुलांना व्यसमुक्ती शपथ देऊन व्यसनमुक्ती पर पथनाटय व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम अतिषय प्रखर पणे केले एकूण 7794 लोकांनी सकारात्मक प्रतिसाद या अभियान दिला  व्यसनमुक्ती जागृती संदर्भात संपूर्ण तालुक्यात घेतले व व्यसनमुक्ती साठी जागृती केली अशा भरीव स्वरूपाच्या कार्याबद्दल महाविदयालयास सावित्रीबाई फुले पुणे विदयापिठातील , पुणे नाशिक , अहमदननगर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे की त्या महाविदयालयास व्यसन मुक्ती संदर्भात पुणे विदयापिठा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व सबंध फाऊंडेशन क्यसनमुक्ती जागृती करते त्या अतर्गत अतिषय प्रभावी जनजागृती केल्याबद्दल हे  प्लॅटीनीअम मिडल मिळाले त्याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे , उपध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी .डी खानदेशी , विश्वासराव आठरे, मुकेश दादा मुळे  , पारनेर पंचायत समितीचे  माझी सभापती राहूल झावरे पाटील यांच्यासह विश्वस्त मंडळाने पारनेर महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुक केले

   व्यसनमुक्ती अभियान घेण्यासाठी उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

   कार्यक्रम अधिकारी प्रा.संजय आहेर व प्रा.स्नेहल आहेर यांच्या मार्गदर्शना खाली गावोगावी जाऊन पथनाट्य साजर करूण जागृती केली व विशेष परिश्रम घेतले.

    अभियान यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम अधिकारी  डॉ अशोक घोरपडे, डॉ़ हरेष शेळके,कार्यालयीन अधिक्षक सुनिल चव्हाण ,कार्यक्रम डॉ.सुधीर वाघ,अधिकारी प्रतिक्षा तनपुरे यांचे देखील मार्गदर्शन लाभले व राष्ट्रीय सेवा योजनच्या सर्व स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमातुन मेडल मिळाले व ते देखील मोठया प्रमाणात  सहभागी झाले.

महाविदयालयाने समाजाप्रती दायित्व सिद्ध केले - प्राचार्य  डॉ रंगनाथ आहेर

  अधुनिक भारताच्या जडण घडणीत युवकांचा सहभाग लक्षणीय असणे गरजेचे असते युवक हा बुद्धीमान कुशल असून महाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्ते बरोबर इत्तर सामाजीक कार्यात भाग घेऊन आपल्या गुणवत्तेची उंची गाठत असतो व आपली समाजाप्रती असणारी भुमिका निभावते व अशा उपक्रमामधून युवा शक्ती जागृत करण्याचे काम करत आहे म्हणून असा उपक्रम हाती घेतला या उपक्रमातुन महाविदयालयाचे समाजा प्रती दायित्व सिद्ध केले अशी खंत प्राचार्य  डॉ रंगनाथ आहेर यांनी व्यक्त केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या