Ticker

6/Breaking/ticker-posts

पंतप्रधान ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोडवर: युवक काँग्रेसची जोरदार टीका

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ.नगरः  करोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याला मदत देण्याकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राज्यातीस सत्ताधारी पक्षांकडून होत आहे. प्रदेश युवक काँग्रेसनेही यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान यांच्यातील काल्पनिक संवाद ट्विट करीत पंतप्रधान डू नॉट डिस्टर्बमोडवर असल्याची टीका केली आहे.

 राज्यातील ऑक्सिजनच्या टंचाई संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान कार्यालयाशी अनेकदा संपर्क साधला. मात्र, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या बातम्या येत होत्या. हा संदर्भ घेऊन तांबे यांनी एका काल्पनिक संवादाचे ट्विट करत निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयात संपर्क केल्यानंतर त्यांना पंतप्रधान सध्या डू नॉट डिस्टर्बमोडवर असल्याचे सांगण्यात येते. ते केव्हा उपलब्ध होतील, असे विचारले असता पाच राज्यांतील निवडणुका संपल्यावर २ मे नंतर भेटतील, असे उत्तर त्यांना दिले जाते, असा काल्पनिक संवाद ट्विट करून पंतप्रधान करोना नियंत्रणापेक्षा निवडणुकांना जास्त महत्व देत असल्याचा आरोप तांबे यांनी केला आहे. तांबे यांनी यापूर्वीही विविध विषयांवरून थेट पंतप्रधानांना टार्गेट केले आहे.

यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यातील आणि देशातील करोनाच्या गंभीर परिस्थितीला पंतप्रधानांना जबादार धरून टीका केली होती. त्यासोबतच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही रेमडेसिव्हिरच्या बाबतीत केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेकडून प्रवक्ते खासदार संजय राऊत हेही सातत्याने केंद्रावर टीका करीत आहेत.

मधल्या काळात मुख्यमंत्री ठाकरे यांचा पंतप्रधानांशी थेट संपर्क झाल्याचे आणि राज्यातील ऑक्सिजन व औषधांच्या पुरवठ्यासंबंधी त्यांच्याकडे मागण्या केल्या असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांनी त्या ऐकून घेऊन संबंधित यंत्रणाना सूचनाही केल्याचे वृत्त आहे.


सध्या परिस्थिती बिकट झालेली असताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे. सरकार आणि प्रशासनावर राग व्यक्त केला जात असून आता आंदोलनेही सुरू झाली आहेत. तर दुसरीकडे या परिस्थितीला जबाबदार कोण
, यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कलगीतुरा रंगला असल्याचे दिसून येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या