लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर :-गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतन वर्षांचा
प्रारंभ. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी, दिवाळी
सणातील पाडवा (अर्धा) हे साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या दिवशी
शुभ कार्य पार पाडली जातात तसंच महत्त्वपूर्ण नवीन संकल्पही केले जातात. सण साजरे
करण्यामागील धार्मिक, पारंपरिक महत्त्वाशिवाय नैसर्गिक व
आपल्या आरोग्याशी संबंधितही अनेक गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने आणि गुळाचे सेवन
करण्यांचं विशेष महत्त्व आहे. याच दिवशी कडुलिंबासह अन्य पदार्थ एकत्रित करून
प्रसाद तयार केला जातो. उन्हाळा बाधू नये तसंच आरोग्य निरोगी राहावे, यासाठी कडुलिंबाची पाने व गूळ
खाण्याचा सल्ला आपल्याला थोरामोठ्यांकडून दिला जातो. पित्त, भूक
न लागणे, पोटदुखी, त्वचाविकार त्वचेवरील
डाग, सांधेदुखी, तोंडाचे विकार यासासह
अन्य कित्येक आजारांवर कडुलिंबाचा पाला व गूळ रामबाण आयुर्वेदिक उपाय मानला जातो.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण दैनंदिन स्वरुपातही कडुलिंबाची पाने व गुळाचे सेवन
केल्यास कोणते आरोग्यदायी फायदे मिळू शकतात,
जाणून घेऊया ..
कडुलिंबाच्या पानांची चव जरी कडू असली तरीही याद्वारे आरोग्यास
सर्वाधिक फायदे मिळतात. उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढून काही आजार उद्भवण्याची शक्यता
असते. या समस्यांपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण
कडुलिंबाच्या पाल्याचे वेगवेगळ्या स्वरुपात सेवन करू शकता. कडुलिंब ही एक
आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी - फंगल, अँटी - ऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल यासारखे गुणधर्म आहेत. तसंच यामध्ये
प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी,
फायबर, फॉस्फरस, पोटॅशिअम
यासारख्या पोषण तत्त्वांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
0 टिप्पण्या