Ticker

6/Breaking/ticker-posts

संयम आवश्यक! सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या दीड लाखांच्या पुढे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली : करोना रुग्णसंख्या दररोज एक नवा रेकॉर्ड कायम करताना दिसतेय. अशावेळी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी संयम बाळगणं आवश्यक झालंय. प्रशासनाच्या सक्तीशिवायही करोना नियमांची अंमलबजावणी करणं हे नागरिकांचं कर्तव्य बनलंय.

सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ११ एप्रिल २०२१ रोजीच्या २४ तासांत देशात जवळपास १.६९ करोना रुग्ण आढलले आहेत. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. हाच वेग कायम राहिला तर देशात दररोजची संख्या अगदी काही दिवसांत दोन लाखांवर पोहचू शकते. राज्यात २४ तासांत तब्बल ९०४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६९ हजार ९१४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ९०४ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ३५ लाख २५ हजार ३७९ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७० हजार २०९ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

उत्तर प्रदेश (१५ हजार २७६), दिल्ली (१० हजार ७७४), छत्तीसगड (१० हजार ५२१) , कर्नाटक (१० हजार २५५) या राज्यांत आढळले आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण (६३ हजार २९४),

 गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊन असतानाही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. आज राज्यात कधी नव्हे ते  63,294 सर्वाधिक तर महाराष्ट्रात 349 कोरोना बाधितांच्या मृत्यूचीही नोंद झालीय.

 

सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.7 टक्के एवढा

सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.7 टक्के एवढा आहे. राज्यात 63,294 नवे रुग्ण सापडल्यानंतर आता राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5,65,587 एवढी झालीय. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण 34, 07, 245 झालीय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे आणि औरंगाबाद, नागपूर यांसारख्या जिल्ह्यांतील परिस्थिती बिघडलीय. अनेक रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी बेडच मिळत नाहीयेत. तर अनेक रुग्णांना रेमडेमीसीव्हर इंजेक्शनची कमतरता भासतेय. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमधल्या स्मशानभूमीत रुग्णांना अग्नी देण्यासाठी रांगा लागण्याचं चित्र निर्माण झालंय.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या