Ticker

6/Breaking/ticker-posts

लग्नानंतरची नवऱ्याची पहिली मॅच; बुमराहच्या पत्नीचा अनोखा ‘प्रेमाचा अंदाज !’

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वा IPL 2021 अतिशय थाटात सुरुवात झालीय. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सने (RCB) रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला हरवून स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर मात करत 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला. पण याचदरम्यान पती पत्नीचं एकमेकांवर किती प्रेम असतं आणि ते व्यक्त करण्याचा अंदाज किती वेगळा असतो, हे क्रिकेट रसिकांना कळालं ते यॉर्कर किंग  जसप्रित बुमराह आणि त्याची पत्नी क्रिकेट समालोचक संजना गणेशन यांच्या अनोख्या प्रेमाच्या अंदाजातून…! 

निळ्या ड्रेसमध्ये संजनाची एन्ट्री

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर् बंगळुरु यांच्यात आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना पार पडला. या सामन्याचं समालोचन करण्यासाठी पेशाने समालोचक असलेली जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन जेव्हा आली तेव्हा तिने अंगावर वन शोल्डर निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. साहजिक नेटकऱ्यांना हे कनेक्शन कळालं आणि त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कुणी म्हणालं प्रेम असावं तर असंतर कुणी म्हणालं, नवरा बायकोचं प्रेमचं वेगळं असतं…!

नेटकऱ्यांच्या प्रतिभेला बहर

लग्नानंतर बुमराहची ही पहिलीच मॅच होती. पहिल्यात मॅचमध्ये जसप्रीत आणि संजनाची अशी लव्ह केमेस्ट्री पाहायला मिळाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रेमाचा माहोल बनवला. ओ माय गॉड, ट्रू लव्ह…’ अशा प्रकारचे मिम्स नेटकऱ्यांनी शेअर केले.

मुंबईची इंडियन्सची जर्सी ही निळ्या रंगाची आहे तर आरसीबीची जर्सी ही लाल रंगाची आहे. साहजिक संजनाने आपल्या नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.

बुमराह आणि संजना काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रित बुमराह नुकताच विवाहबद्ध झाला. प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबततो लग्नबेडीत अडकला. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. बुमराहबरोबर लग्नासाठी संजना गणेशन आणि आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच नाव चर्चेत होतं. पण अखेर बुमराहने संजनासोबत लगीनगाठ बांधली.आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या