Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश ; आज रात्रीपासून ‘हे’ असेल बंद आणि ‘ह्यांना’ असेल सूट

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर : - जिल्ह्यात कोरोनानेआपले हातपाय चांगलेच पसरवले आहेत. प्रशासन अनेक उपाययोजना करताना दिसत आहे परंतु कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश दिले आहेत. प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन , अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये या आदेशान्वये दि .05 / 04 / 2021 रोजी रात्री 08.00 पासुन ते दि .30 / 04 / 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये खालील बाबींस मनाई आहे. –
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपावेतो 5 किंवा अधिक लोकांनी एकत्र फिरण्यास अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास निर्बध राहील . उर्वरित कालावधीत म्हणजे सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळी 7.00 आणि शुक्रवारी रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजेपावेतो अधिकृत कारणाशिवाय व परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर मनाई असेल . दुकाने , मार्केट आणि मॉल्स सर्व दुकाने , मार्केट आणि मॉल्स ( अत्यावश्यक सेवा वगळता ) हे संपूर्ण दिवसभर बंद असतील .
सार्वजनिक वाहतुक – बस ॲटो रिक्षा चालक +2 प्रवासी फक्त, टॅक्सी / कार ( चार चाकी ) चालक + प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडील मंजुर क्षमतेच्या 50 % प्रवासी यांना परवानगी , चारचाकी टॅक्सी मध्ये कुठल्याही एका व्यक्तीनेही मास्क परिधान न केल्यास असा कसुरदार व्यक्ती व टॅक्सी चालक यांचेकडून प्रत्येकी 500 / – रुपये दंड आकारण्यात येईल . केशकर्तनालय अमी ब्युटी पार्लर बंद राहतील.
लग्नामधेही केवळ 50 लोकाना परवानगी , अंत्यविधी साठी 20 लोकांची मर्यादा असेल.

  • यांना सूट –
    वैद्यकिय व इतर अत्यावश्यक सेवांना यामधुन सुट असेल आणि त्यांच्या हालचाली व क्रियाकल्पांवर निबंध असणार नाहीत .
  • अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल –
    a . रुग्णालये , रोग निदान केंद्रे , क्लिनिक , वैद्यकिय विमा कार्यालये , औषधालये , औषध कंपन्या व अन्य वैद्यकिय व आरोग्य विषयक सेवा
    b . किराणा मालाची दुकाने , भाजीपाला दुकाने , दुग्धालये , बेकरी , कन्फेक्शनरी , अन्न पदार्थ विक्री दुकाने
    c . सार्वजनिक वाहतुक- ट्रेन , टॅक्सी , अॅटो आणि सार्वजनिक वाहतुक व्यवस्था
    d . स्थानिक स्वराज्य संस्थाचे मान्सुन पूर्व कामकाज .
    e . स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देण्यात येत असलेल्या सर्व सार्वजनिक सेवा .
    f . सर्व प्रकारची माल वाहतुक
    g . कृषी विषयक सर्व सेवा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या