Ticker

6/Breaking/ticker-posts

खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

 जमावबंदी व साथरोग निर्मूलन कायद्याचे उल्लंघनलोकनेता न्यूज                                         

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 राहता:- जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पिंपरी निर्मळ शिवारात ४०० के व्हीं महावितरण केंद्र जवळ बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व covid-19 आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर १४०/२०२१ नुसार भा द वी १८८,२६९,२७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुदाम फटांगरे यांच्या फिर्यादीवरून खा.सदाशिव लोखंडे,नानासाहेब शेळके, अण्णासाहेब वाघे, श्रीकांत मापारी, सोमनाथ गोरे ,सौरभ शेळके ,विठ्ठल शेळके ,शिवाजी शेळके ,विलास गुळवे प्रभाकर गायकवाड, बाबासाहेब पठारे, अशोक पूर्ण नाव माहीत नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 अहमदनगर जिल्ह्यासह राहता तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असताना खासदारांसारखे जबाबदार लोकप्रतिनिधी बेकायदेशीर जमाव जमवून भूमिपूजनाचा कार्यक्रम करत आहेत. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत काल आरपीआयचे राहता तालुका अध्यक्ष करण कोळगे यांनी लोणी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि समाधान पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोसई नानासाहेब सूर्यवंशी करत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या