Ticker

6/Breaking/ticker-posts

यंदा मुबलक पाऊस आणि पिके परंतु आरोग्याचा प्रश्न कायम..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 कर्जत:- यावर्षी सर्वत्र मुबलक पाऊस पडणार असून पिके देखील चांगली येणार आहे मात्र यावर्षी देखील आरोग्याचा प्रश्न जनतेला भेडसावणार आहे आखाती देशांमध्ये युद्ध होऊन नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये येणार असून याचा जगभरातील जनतेला व राजाला त्रास होणार आहे असे भाकीत कर्जत येथील संत गोदड महाराज यांच्या संवत्सरी मध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

कर्जत येथील थोर संत सद्गुरु गोदड महाराज यांनी साठ वर्षाची संवत्सरी लिहून ठेवली आहे यामध्ये  पिकपाणी  याचप्रमाणे राजकारण संकटे नैसर्गिक आपत्ती याबाबत भाकीत करून ठेवले आहे याचे वाचन दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी मंदिरांमध्ये करण्यात येते  गोदड महाराज मंदिराचे विश्वस्त पुजारी पंढरीनाथ  महाराज काकडे व अनिल महाराज काकडे यांनी या संवत्सरी चे वाचन आज केले दरवर्षी हे भाकीत ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक येत असतात परंतु या वर्षी कोरो ना मुळे भाविकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता यामुळे मंदिरात मध्ये मोजक्या पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत या चे वाचन करण्यात आलंं वर्षभर शेतकरी आणि नागरिक भाविक या भाकितांची वाट पाहत असतात अखेर त्याचं वाचन आज या ठिकाणी सर्व नियम पाळून करण्यात आले 

गोदड महाराज यांच्या या भाकीत त्यामध्ये  सांगितले आहे की ,यावर्षी प्लवंग संवतसरी असून याचा स्वामी नळ आहे यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडणार आहे पिके देखील चांगली येणार आहेत मात्र आखाती देशांमध्ये यावेळी आगी लागण्याच्या  घटना घडणार आहेत याशिवाय पश्चिम विभागामध्ये चक्रीवादळाचा धोका संभवणार आहे यामुळे अराजकता माजणार असून आखाती राष्ट्रांमध्ये पुन्हा युद्ध भडकून याचा त्रास राजा आणि जनतेला होणार आहे यावर्षीदेखील आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा राहणार आहे

अवकाळी पाऊस

यावर्षीदेखील अवकाळी पाऊस वादळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे यामुळे मोठे नुकसान देखील होण्याची शक्यता आहे अवकाळी पावसा मध्ये वादळ वारा याचे वर्णन करण्यात आला आहे

यावर्षी पाऊस मान चांगले सांगितले आहे खरीप हंगामात हंगामात पिके चांगली येणार आहे मात्र काही ठिकाणी जास्त पावसाने नासाडी होण्याची शक्यता आहे. मुग ऊस गहू भात ही पिके मुबलक येणार आहेत या वर्षी पाऊस पडणार असून रोहिणी नक्षत्र तटावर पडणार असल्यामुळे धान्य येणार आहे  मृगनक्षत्र सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कमी पाऊस आहे परंतु नंतर चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये श्रावण भाद्रपद महिन्यात पाऊस आहे

राजकीय अराजकाच्या माजेल

या भाकीत त्यामध्ये असे वर्णन करण्यात आला आहे की आश्विन आणि कार्तिक महिन्यामध्ये जागतिक पातळीवर अराजकता माजेल आखाती देशांमध्ये युद्ध होईल कांती या देशाला पीडा होईल रोगराई वाढेल व राजकारणी आणि जनतेला या काळामध्ये जास्त त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर वैशाख महिन्यात आखाती देशांमध्ये आग लागून पश्चिम भागात चक्रीवादळामुळे नुकसान संभवते आहे

अशी सर्व परिस्थिती असली तरी सर्वात समाधान देणारी बाब म्हणजे यावर्षी पाऊस सर्वत्र चांगला पडणार असून येथे मुबलक येणार आहेत त्यामुळे बळीराजा सुखावला आहे मागील वर्षी देखील चांगला पाऊस माघारी पिके सांगितली होती

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या