Ticker

6/Breaking/ticker-posts

आ. लंके यांचा सोशल प्रोजेक्ट ! भाळवणीत १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर; आज उदघाटन

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

भाळ्वणी :- वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी चोवीस तास झोकून देणारे आमदार नीलेश लंके कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना केवळ आपल्या सहकाऱ्यांच्या सामाजिक बांधिकीच्या जोरावर आ. लंके यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे.  तब्बल  १ हजार बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औैचित्य साधून रूग्णांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे. 

 भाळवणी येथील नागेश्‍वर मंगल कार्यालयात शरदचंद्र आरोग्य मंदीर उभारण्यात आले असून तेथे एक हजार रूग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता या आरोग्य मंदीराचे लोकार्पण करण्यात येईल. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखर्णा, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह इतर प्रशासकिय अधिकारी सर्व स्थानिक दैनिकांचे संपादक यावेळी उपस्थित राहणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. 

 आ. लंके म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. गरजू रूग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. अशा स्थितीत मतदार संघातील प्रत्येक रूग्णास योग्य उपचार मिळाले पाहिजेत या भावनेतून आपण पुन्हा एक हजार बेडचे आरोग्य मंदीर सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सीजन बेडची आवष्यकता भासते आहे. त्यासाठी याच आरोग्य मंदीरात १०० रूणांसाठी ऑक्सिजन बेडचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे दाखल झालेल्या रूग्णास सर्व सुविधा नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या माध्यमातून मोफत देण्यात येणार आहे. रूग्णांना आवष्यक पौष्टीक आहार, चहा तसेच नास्त्याची जबाबदारीही प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी घेतली  आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या