Ticker

6/Breaking/ticker-posts

मोठी दूर्घट्ना : ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू

ऑक्सिजन टाकीचा कॉक बदलत असताना 'अशी' घडली घटना

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नाशिक: महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या रुग्णालयात अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर या ऑक्सिजन गळतीचा परिणाम झाला. मात्र, अतिशय संवेदनशील असलेल्या रुग्णालयासारख्या ठिकाणी ही ऑक्सिजनची गळती कशी झाली हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नादुरुस्त असल्याची माहिती मिळत आहे. त्यातूनच ही गळती सुरू झाली. असे असले तरी देखील दुरुस्तीद्वारे ही गळती थांबवता येते आणि येथेही तोच प्रयत्न झाला. मात्र, दुरुस्तीचे हे काम सुरू असताना टाकीचा हा नादुरुस्त असलेला कॉक पूर्णपणे तुटला आणि ऑक्सिजन गळती सुरू झाली. येथे नवा कॉक बसवण्यासाठी सुमारे २ तासांचा कालावधी लागला. तो पर्यंत टाकीतील सर्व ऑक्सिजनची गळती झालेली होती.

याचा परिणाम थेट व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांवर झाला. ऑक्सिजनची टाकीच पूर्ण रिकामी झाल्यामुळे रुग्णालयातील व्हेंटिलेटरद्वारे देण्यात येत असलेल्या ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि रुग्णांन ऑक्सिजन मिळेनासा झाला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण दगावले. यात २२ रुग्णांचा मृत्यू झाला.

ही भीषण घटना आज बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. त्यानंतर रुग्णालयात एकच धावपळ उडाली. काही क्षणातच रुग्णालयात हाहाकार माजला. रुग्णांचे नातेवाईक आपापल्या रुग्णांना वाचवण्याचा आटापीटा करू लागले. अनेकांनी आपला रुग्ण दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच आमचे रुग्ण दगावल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांचे नातेवाईक देत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या