Ticker

6/Breaking/ticker-posts

हेल्प पिपल्स ग्रुप व शेवगाव तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम ; कोविड सेंटरसाठी ५१ हजारांचे साहित्य भेट

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क

शेवगाव : सतत सामाजिक कार्यक्रम व  उपक्रमात आघाडीवर असलेल्या हेल्प पीपल्स ग्रुप व शेवगाव तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील तीन शासकीय कोविड सेंटरसाठी ५१ हजार रुपयांचे अत्यावश्यक साहित्य भेट देण्यात आले. या साहित्याचा उपयोग गरजू रुग्ण व अहोरात्र रुग्णांची काळजी वाहणाऱ्या आरोग्य विभागातील आरोग्य दूतांसाठी होणार आहे. 

       या साधन सामग्रीत आरोग्य दूतांसाठी मास्क, हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर तसेच कोविड रुग्णांसाठी इंजेक्शन, औषधे, कप सिरप, मास्क व वाफेचे मशीन आदींचा समावेश आहे. हेल्प पीपल्स ग्रुप व पत्रकार संघाच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आपापसात वर्गणी करून साधन सामग्री खरेदीसाठी ५१ हजार रुपयांचा निधी उभा केला.

     काल बुधवारी (दिं २८ रोजी) शेवगाव तहसील कार्यालयात पार पडलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास बुधवंत यांच्या हस्ते हे साहित्य तहसीलदार अर्चना पागिरे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. गट विकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिराणी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे, शिक्षण विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी शैलजा राऊळ, आरोग्य विस्ताराधिकारी डॉ.सुरेश पाटेकर, डॉ.विजय लांडे तसेच पत्रकार यावेळी उपस्थित होते. 

या स्तुत्य उपक्रमाचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी कौतुक करून कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत पत्रकारांनी जागरूक राहावे. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या