Ticker

6/Breaking/ticker-posts

जेष्ठ पत्रकार, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सोपानराव दरंदले (नाना ) यांचे निधन

                              

  लोकनेता न्यूज

                                      
  (
 ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 सोनई :- येथील जेष्ठ पत्रकार, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सोपानराव दरंदले (नाना ) यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांचे व ७ o वर्ष होते . त्यांच्या पश्चात ३ मुले , सुना , नातवंडे असा परिवार आहे .कै. सोपानराव दरंदले हे गेले काही दिवसांपासून आजारी होते . त्यांचेवर नगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते . मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली . 

 संपूर्ण नेवासा तालुक्या सह जिल्हयात नाना म्हणूनच ते परिचित होते . जिल्ह्यातील पत्रकारितेच्या पहिल्या फळीतील ते अत्यंत अभ्यासू पत्रकार होते . तब्बल ५० वर्षाची पत्रकारितेची त्यांची कारकिर्द राहिली . नेवासा तालुक्याच्या विविध प्रश्नांची त्यांनी लेखणीच्या माध्यमातून तड लावली . विशेषतः सोनई, घोडेगांव, चांदा या पट्ट्याच्या स्थित्यंतराचे अन् झालेल्या विकासाचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते .ज्येष्ठ या नात्याने तालुक्यासह सर्वच पत्रकारांना ते मोलाचे मार्गदर्शन करत . त्यांच्या निधनाने पत्रकारांचा मार्गदर्शक हरपला आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या