Ticker

6/Breaking/ticker-posts

नेवाशातील चांदा येथे चोरट्यांचा धुमाकूळ..! पोलिसांपुढे आव्हान

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 नेवासा:- आधिच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या नेवासा तालुक्यातील जनतेला हे कमी होते म्हणुय चोरटयानी आत्ता सळो कि पळो करुन सोड्ले आहे. त लुक्यातील चांदा येथे चोरट्यांचा धुमाकूळ थांबता थांबेना दोनच दिवसांपूर्वी रावसाहेब दिवटे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी दहा तोळ्याचा ऐवज चोरून नेला ही घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांनी चांदा गावांमध्ये दोन ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की निलेश दिलीप पंडित यांच्या राहत्या घराच्या खिडकीमधून चोरट्यांनीआत प्रवेश करून कपाटातील सामानाची उचकापाचक करून त्यामधील सोन्याचे मनी मंगळसूत्र दोन अंगठ्या  असे एकूण पावणे दोन तोळ्याचा ऐवज व रोख रक्कम दोन हजार रुपये चोरट्यांनी रात्री एक तीन  वाजेच्या दरम्यान चोरून नेल्याची घटना घडली यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा  दत्त मंदिराकडे कुंभार गल्ली याठिकाणी वळविला व त्या ठिकाणी आदिनाथ दत्तात्रेय धुमाळ यांच्या घरामध्ये प्रवेश करून कपाटातील एक तोळ्याची पोत जोडवे व सव्वा दोन हजार रुपये रोख रक्कम व लॅपटॉप चोरटे चोरून नेत असताना  घरात आवाज आल्याने गीताराम धुमाळ हे जागे झाले व चार चोरटे त्यांना  पळताना दिसले त्यांनी आरडाओरड केल्याने तेथून चोरट्यांनी देवीच्या बागेकडे धूम ठोकली. 

 पहाटे तीन  वाजेच्या    दरम्यान लहान  बाळाला   भूक लागल्यामुळे पंडित दाम्पत्याला जाग आली  असता आपल्या घरातील कपाटाची कुणीतरी उचकापाचक केल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी लगेच चांद्याचे  पोलीस पाटील कैलास अभिनव  यांना घटनेची माहिती दिली पोलीस पाटील कैलास अभिनव यांनी सोनई पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली      सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  रामचंद्र कपेॅ  तसेच पोलीस स्टेशनचे बाबासाहेब वाघमोडे, दत्तात्रय गावडे, आदिनाथ मुळे, व चालक ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली    
निलेश   पंडित यांच्या घरी पोलिसांनी श्वान पथक आणले असता श्वान पथक जागेवरच घुटमळले      चोरट्यांचे भीतीने अक्षरशः चांदा ग्रामस्थ भयभीत झाले असून पोलिसांना एक प्रकारे चोरांटयनी आव्हानच दिले असल्याचे यावरून दिसून येते पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी  मागणी ग्रामस्थांनी केली आहे  या घटनेची फिर्याद निलेश पंडित व आदिनाथ धुमाळ यांनी दाखल केला असून गुन्हा र.न.१२२/२१ कलम
४५७ ,३८० नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या