Ticker

6/Breaking/ticker-posts

येत्या दोन दिवसात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल, सहकार्य करा, धनंजय मुंडेंचं आवाहन

 


लोकनेता न्यूज                                         

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 बीड : बीडमथील कोरोना रुग्नसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामुळे ऑक्सिजन रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच  यासह इतर अडचणी दूर होतील, असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं आहे.

 

बीडच्या कोरोना स्थितीवरुन राजकारण

बीडमथील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यामुळे वैद्यकीय सेवांवर ताण येत आहे. यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ट्वीटरवॉर रंगले होते. यावेळी बहिण-भावामध्ये बीडच्या कोरोना स्थितीवरुन आरोप प्रत्यारोप सुरु होते. यानंतर अखेरीस बीडमध्ये येत्या दोन दिवसात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल. तसेच इतर अडचणी दूर होतील, असे आश्वासन धनंजय मुंडेंनी दिले.

दोन दिवसात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. दुसऱ्या लाटेत अधिक धोका वाढला असून जिल्हावासियांनी प्रशासनास सहकार्य करावं, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे कोरोनाग्रस्त नातेवाईकांची धावपळ उडते आहे. आज जिल्हा प्रशिक्षण केंद्राबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती. मात्र रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता असली तरी येत्या दोन दिवसात हे इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली.

तसेच इतर अडचणी दूर होतील असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. तर बीडमध्ये 350 बेड वाढवले जाणार आहेत. त्याशिवाय लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटर पूर्ववत सुरू आहे. या बरोबरच अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात 150 बेड वाढवणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय

राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं होतं.

“ REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,” असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले होते. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता

धनंजय मुंडेंची टीका 

यानंतर धनंजय मुंडे यांनीही सलग सहा ट्वीट करत पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडेवर टीका केली होती. ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! असेही ट्वीट धनंजय मुंडेंनी केले होते.

पंकजा मुंडेंचा टोला

राज्याच्या भल्यासाठी PM, जिल्ह्याच्या CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या