Ticker

6/Breaking/ticker-posts

'अशी' सुवर्णसंधी पुन्हा नाही ; लॉकडाउनमध्ये फक्त ३०४९९ रुपयांत खरेदी करा Apple iPhone

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, आयफोनची किंमत जास्त असल्याने अनेक जण ते खरेदी करू शकत नाहीत. तुम्हाला जर आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर सध्या आयफोन ११ खरेदी करणे फायदेशीर ठरणार आहे. ५४ हजार ९०० रुपये किंमत असलेला आयफोन ११ सर्व डिस्काउंट नंतर फक्त ३० हजार ४९९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो. जाणून घ्या, आयफोन ११ वर मिळणाऱ्या या ऑफरसोबत आयफोनचे फीचर्स.

किंमत आणि ऑफर
Apple iPhone 11च्या ६४ जीबी व्हेरियंटची ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर किंमत ५४ हजार ९०० रुपये आहे. परंतु, यावर १४ टक्के डिस्काउंट नंतर या फोनची किंमत ४६ हजार ९९९ रुपये झाली आहे. म्हणजेच या फोनवर ७ हजार ९०१ रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Flipkart  Axis Bank Credit Card द्वारे फोन खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे. तर Bank of Baroda Mastercard डेबिट कार्ड वरून पेमेंट केल्यास १० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत या स्मार्टफोनवर १६ हजार ५०० रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणार आहे. त्यामुळे या फोनला तुम्ही खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता.

फोनची फीचर्स
iPhone 11 मध्ये ६.१० इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 828x1792 पिक्सल आहे. प्रोसेसर म्हणून यात Apple A13 Bionic हैक्सा कोर प्रोसेसर दिला आहे. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये iPhone 11 iOS 13 वर काम करतो. या आयफोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. या आयफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा सोबत १२ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा दिला आहे. १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनला Black, Green, Purple, Red, White आणि Yellow कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केले आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 3110mAh ची बॅटरी दिली आहे.

अॅपल आयफोन 11 स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मन्स

Apple A13 Bionic

स्टाेरेज

64 GB

कॅमेरा

12 MP + 12 MP

बॅटरी

3110 mAh

डिस्प्ले

6.1" (15.49 cm)

रॅम

4 GB

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या