Ticker

6/Breaking/ticker-posts

‘या’ बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, अनेक पदं रिक्त, थेट 60 लाखांपर्यंत पगार

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः जर तुम्हाला बँकेत नोकरी हवी असेल तर आपण आयडीबीआय (IDBI) मध्ये अर्ज करू शकता. आयडीबीआय बँकेने मुख्य डेटा अधिकारी, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांच्यासह अनेक पदांवर भरती काढलीय. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट idbibank.in च्या माध्यमातून पदासाठी अर्ज करू शकतात. पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2021 पर्यंत आहे. 

IDBI  बँकेनं निवडलेल्या उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या शाखांशिवाय इतर कोणत्याही शाखेत नेमणूक करू शकते. कृपया अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचा. बँक भरती अधिसूचनेची लिंक खाली दिली आहे.

रिक्त जागांची माहिती

मुख्य डेटा अधिकारी – 1 पद
प्रमुख प्रोग्रामर व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) – 1 पद
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल) – 1 पद
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (डिजिटल)- 1 पद
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 1 पद
प्रमुख डिजिटल बँकिंग – 1 पद

कोण अर्ज करू शकेल?

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवीधर किंवा अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर उमेदवार मुख्य डेटा अधिकारी, प्रमुख, उपमुख्य तंत्रज्ञान या पदांसाठी अर्ज करू शकेल. मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी आणि प्रमुख डिजिटल बँकिंग या पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान यांसारख्या संबंधित शाखेतून अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवार अर्ज करू शकतात. संपूर्ण माहितीसाठी अधिसूचना लिंकवर जा.

वयोमर्यादा

हेड डिजिटल बँकिंग आणि CISO पदासाठी किमान 45 वर्षे ते जास्तीत जास्त 55 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. तर अन्य पदांवर अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे निश्चित केली गेलीय.

अर्ज कसा करावा हे जाणून घ्या?

पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करावा आणि भरावा. अर्ज भरल्यानंतर, ई-मेलच्या विषयावर पदाचे नाव लिहा आणि ईमेल आयडीवर ‘recruitment@idbi.co.in’ पाठवा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 मे 2021 आहे.

वेतन किती?

मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी आणि प्रमुख डिजिटल बँकिंग अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या उमेदवारांना 50 लाख ते 60 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पगार देण्यात येईल. तर इतर सर्व पदांचे वेतन पॅकेज हे वर्षाकाठी 40 लाख ते 45 लाख रुपये असेल.

निवड प्रक्रिया

अर्जासह निवड प्रक्रियेमध्ये पात्रता निकष, पात्रता आणि अनुभव इत्यादींवर आधारित प्राथमिक तपासणी आणि शॉर्टलिस्टिंग समाविष्ट असेल. केवळ अशा शॉर्टलिस्टेड उमेदवारांना संबंधित पदांतर्गत उपलब्ध असलेल्या रिक्त जागांच्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीत पात्रता आणि पात्रतेच्या आधारे पुढील निवडीसाठी त्यांना शॉर्टलिस्ट केले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या