Ticker

6/Breaking/ticker-posts

MES मध्ये ड्राफ्ट्समन आणि पर्यवेक्षक पदांसाठी भरती..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः  केंद्र सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. मिलिट्री इंजीनियर सर्व्हिसेस् (MES) ने ड्राफ्ट्समन आणि पर्यवेक्षक पदांसाठी भरती सुरू केली आहे. एकूण ५०२ रिक्त जागांसाठी एमईएसने अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २२ मार्च २०२१ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार अधिकृत वेबसाईट mes.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ड्राफ्ट्समन आणि सुपरवायझर पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ एप्रिल २०२१ पर्यंत आहे. अर्जाचे शुल्क देखील १२ एप्रिलपर्यंत भरायचे आहे. या भरतीअंतर्गत मिलिट्री इंजिनीअर सर्व्हिसेस १६ मे २०२१ रोजी परीक्षा घेणार आहे.

पात्रता काय?
या व्हेकेन्सीअंतर्गत ड्राफ्ट्समन पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून आर्किटेक्चरमध्ये पदविका पदवी असणे अनिवार्य आहे. पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / व्यवसाय अभ्यास / सार्वजनिक प्रशासन या विषयात एक वर्षाची मास्टर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / व्यवसाय अभ्यास / लोक प्रशासन किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधर उमेदवारही अर्ज करू शकतात. पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी अधिकृत सूचना वाचा.

रिक्त पदांचा तपशील
पर्यवेक्षक - ४५० पदे
ड्राफ्ट्समन - ५२ पदे
एकूण पदे – ५०२

परीक्षा केंद्रे
या पदांसाठी प्रयागराज (अलाहाबाद), लखनऊ, बरेली, दिल्ली, चंदीगड, जबलपूर, भोपाळ, जयपूर, रांची, नागपूर, देहरादून, कोलकाता, गुवाहाटी, गांधीनगर, कोची, पठाणकोट, चेन्नई, पोर्ट ब्लेअर, पुणे, शिलांग आणि सिलीगुडीसह अनेक शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

असा करा अर्ज?
* प्रथम अधिकृत संकेतस्थळ mes.gov.in वर जा
* वेबसाईटच्या होम पेजच्या डाव्या  बाजूला नवीन नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा.
* यानंतर ‘Application for the Post  [Draughtsman (D’Man)] OR [Supervisor Barrack Store (Supvr BS)]’ येथे जा.
* आवश्यक  तो तपशील भरा आणि नोंदणी करा.
*नोंदणीनंतर  अर्ज भरून सबमीट करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या