Ticker

6/Breaking/ticker-posts

EPFO : महत्त्वाची बातमी; मोठा नियम झाला सोपा ; झंझटीशिवाय काढा पैसे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः  ईपीएफओने आपल्या खातेदारांसाठी नवीन सुविधा सुरू केलीय. आता आपण ईपीएफओ सिस्टीममध्येच एका ठिकाणाहून नोकरी सोडण्याची तारीख प्रविष्ट करू शकता. यापूर्वी कर्मचाऱ्याला यासाठी कंपनीवर अवलंबून राहावे लागायचे. कंपनी स्वतः कर्मचार्‍यांच्या कंपनीत सामील होण्याची आणि सोडण्याची तारीख टाकू शकते किंवा अद्ययावत करू शकते. काही कारणास्तव कंपनीकडून कर्मचार्‍यांच्या बाहेर पडण्याची तारीख अद्ययावत केली नसल्यास पैसे अडकण्याची शक्यता आहे.

नोकरी सोडून दुसर्‍या कंपनीकडे जातो तेव्हा समस्या उद्भवतात

कोणत्याही खासगी मर्यादित कंपनीमध्ये कर्मचार्‍याच्या पगाराचा काही भाग पीएफमध्ये योगदान म्हणून दिला जातो. हे पैसे कर्मचार्‍याच्या पीएफ खात्यात जमा केले जातात. जोपर्यंत कर्मचारी तिथे काम करतो, तोपर्यंत त्यात काहीच अडचण नसते, परंतु जेव्हा तो नोकरी सोडून दुसर्‍या कंपनीकडे जातो तेव्हा समस्या उद्भवतात. बहुतेक प्रकरणांमध्ये असे दिसते आहे की, जुनी कंपनी माहिती अद्ययावत करण्यात मदत करत नाही. कर्मचार्‍यांची ही समस्या आता केंद्र सरकारने सोडविली आहे. आता ते ऑनलाईन आणि सुलभ मार्गाने अद्ययावत करू शकतात.

आपण आपल्या पीएफ खात्यातून सहज पैसे काढू शकता

माजी सहाय्यक आयुक्त ए. के. शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, आता कर्मचार्‍यांना EPFO प्रणालीतून बाहेर पडण्याची तारीख नोंदवण्यासाठी देण्यात आलेल्या नव्या सुविधेमुळे पैसे काढणे किंवा हस्तांतरण करणे सोपे झालेय. आपणास आपल्या पीएफ खात्यातून बाहेर पडायची तारीख देखील प्रविष्ट करायची असल्यास ती प्रक्रिया ऑनलाईन करणे सहससोपे आहे. एकदा EPFO सिस्टममध्ये बाहेर पडण्याची तारीख अद्ययावत केल्यानंतर ती बदलली जाऊ शकत नाही. हे देखील लक्षात ठेवा की, जर आपण अलीकडेच नोकरी सोडली असेल आणि आपल्याला पीएफ खात्यातून बाहेर पडायचे असल्यास 2 महिने प्रतीक्षा करावी लागे,ल कारण ते पीएफमधील नियोक्ताच्या शेवटच्या योगदानाच्या 2 महिन्यांनंतरच अद्ययावत केले जाते.

चला त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया

*प्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा. यूएएन, संकेतशब्द आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून येथे लॉगिन करा. लक्षात ठेवा आपले यूएएन सक्रिय असले पाहिजे.
*आता नव्याने उघडलेल्या पेजवरील मॅनेजटॅबवर क्लिक करा. यानंतर मार्क एक्झिटनिवडा. आता सिलेक्ट इंप्लॉयमेंटड्रॉपडाउन आपल्या समोर दिसेल. त्यामध्ये आपल्या यूएएनशी जोडलेला जुना पीएफ खाते क्रमांक निवडा.
*यानंतर त्या खात्याशी आणि जॉबशी संबंधित तपशीलवार माहिती दिसेल. आता  नोकरी सोडण्याची तारीख आणि कारण टाकून ठेवा. नोकरी सोडण्याचे कारण निवृत्ती, शॉर्ट सर्व्हिस असे पर्याय असतील. त्यानंतर रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करा. आपल्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर येईल. आता निर्धारित ठिकाणी ओटीपी टाका.
* त्यानंतर चेक बॉक्स निवडा. शेवटी अपडेटवर क्लिक करा आणि मग ओके म्हणा. आता आपली बाहेर पडण्याची तारीख सबमिट केली गेली आहे.

तर पैसे काढू शकत नाही

EPFO च्या  मते, आपली बाहेर पडण्याची तारीख अद्ययावत न केल्यास आपण आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही किंवा खाते नवीन कंपनीकडे हस्तांतरित करू शकत नाही. परंतु आता ईपीएफओने केवळ कर्मचार्‍यांना एक्झिटची तारीख अपडेट करण्याचा अधिकार दिला आहे. यामुळे त्यांना हे काम खूप सहजसोपं झालंय.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या