Ticker

6/Breaking/ticker-posts

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना गिफ्ट ! EMI होणार स्वस्त..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 

नवी दिल्लीः देशातील तिसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलंय. रेपो लिंक्ड रेट 10 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांनी कमी केलेत. नवीन दर आजपासून म्हणजेच 15 मार्च 2021 पासून लागू होतील. या कपातीनंतर BRLLR 6.85 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जे किंवा वैयक्तिक कर्ज घेणार्‍या ग्राहकांवर असलेल्या कर्जावरील व्याजाचा बोजा कमी होणार आहे.

 

सर्व किरकोळ कर्ज उत्पादनांना त्याचा फायदा होणार

बाह्य बेंचमार्क रेपो लिंक्ड रेटमधील कपातीबरोबर बँकेची सर्व किरकोळ कर्ज आपोआप समायोजित (Adjust) केली जातील. गृह कर्ज (Home Loan), तारण कर्ज (Mortgage Loan), वाहन कर्ज (Car Loan), शिक्षण कर्ज(Education Loan), वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आणि इतर सर्व किरकोळ कर्ज उत्पादनांना त्याचा फायदा होईल.

कर्जाचे व्याजदर इतके कमी झाले

बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, बीआरएलएलआर कपात केल्यानंतर गृह कर्जावरील व्याज 6.75 टक्के आणि वाहन कर्जावर 7 टक्क्यांपर्यंत कमी होईल. त्याचबरोबर दुसर्‍या तारण कर्जावर 7.95 टक्के आणि शिक्षण कर्जावर 6.75 टक्के कर आकारला जाईल.

याबँकांनीही व्याजदर केले कमी

त्याआधी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), कोटक महिंद्रा बँक (K otak  Mahindra Bank) आणि एचडीएफसी (HDFC) यांनी कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती.

SBI गृह कर्ज स्वस्त, व्याज दर 6.70% पासून सुरू

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी एसबीआयने सध्या गृह कर्ज स्वस्त केलं होतं. गृहकर्ज दरामध्ये 6.70 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली होती. आता एसबीआयमधील गृह कर्जाचा दर 6.70 टक्क्यांपासून सुरू झालाय. ही ऑफर मर्यादित कालावधीची आहे. या व्याजदराचा फक्त 31 मार्चपर्यंत लाभ घेता येणार आहे.

आता कोणत्या बँकेकडे किती व्याजदर?

सध्या सर्वात कमी व्याजदर कोटक महिंद्रा बँकेत असून, गृहकर्ज 6..65  टक्के दराने मिळत आहे. त्याचवेळी एसबीआयमधून 6.70 टक्के दराने कर्ज मिळत आहे आणि एसबीआय बऱ्याच सुविधा देत आहे. एसबीआयने प्रक्रिया शुल्कही माफ केले आहे. त्याशिवाय अ‍ॅक्सिस बँक 6.75 टक्के, एचडीएफसी 6.80, आयसीआयसीआय 6.80 टक्के, बँक ऑफ बडोदा 6.85 टक्के आणि एलआयसी 6.90 टक्के कर्ज देत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या