Ticker

6/Breaking/ticker-posts

2000 रुपयांच्या नोटांबद्दल मोठी बातमी, अर्थ राज्यमंत्र्यांची संसदेत माहिती

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नवी दिल्लीः लोकसभेत 2000 रुपयांच्या नवीन नोटांबाबत सरकारने मोठी माहिती दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोन हजार रुपयांच्या नोटा छापल्या गेलेल्या नाहीत, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेला दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय. अनुराग ठाकूर यांनी सोमवारी सांगितले की, एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांच्या नोटा छापल्या गेलेल्या नाहीत. 20  मार्च 2018 पर्यंत 2000 रुपयांच्या 336.2 कोटींच्या नोटा चलनात आल्यात.

 

आकडेवारीनुसार, 26 फेब्रुवारी 2021 रोजी 2,000 रुपये किमतीच्या 249.9 कोटी चलनी नोटा होत्या. त्या कमी होऊन अनुक्रमे 2.01 टक्के आणि 17.78 टक्के झाल्यात. अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत केल्यानंतर सरकार विशिष्ट मूल्याच्या नोटा छापण्याचा निर्णय घेते.

जाणून घ्या, कधी छापल्या नोटा

अनुराग ठाकूर म्हणाले, आर्थिक वर्ष 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या नोटा छापल्या नव्हत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2019 मध्ये म्हटले आहे की, 2016-17 (एप्रिल 2016 ते मार्च 2017) या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या 3542.991 मिलियन बँक नोटा छापल्या गेल्या. 2017- 18 मध्ये 2 हजार रुपयांच्या 111.507 मिलियन नोटा आणि 2018-19 मध्ये 46.690 मिलियन नवीन नोटा छापल्या गेल्या.

नोव्हेंबर 2016 मध्ये पहिल्यांदा 2 हजार रुपयांच्या नोटा छापल्या

एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या नाहीत. उच्च मूल्याच्या चलनाची मागणी आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. 2  हजार रुपयांची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये प्रथम छापली गेली. काळा पैसा आणि बनावट नोटांना रोखण्यासाठी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मात्र, त्यानंतर मोदी सरकारने 500 रुपयांच्या नवीन नोटा छापल्या, तर 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या. त्याच्या जागी 2 हजार रुपयांची नोट आणली गेली. याशिवाय 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपयांच्या नव्या नोटाही आणल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या